Haranbari Canal : कालवा अपूर्णच...पाणी नाही...मदतही नाही

सटाणा तालुक्यातील हरणबारी डाव्या कालव्याची स्थिती
Haranbari Canal
Haranbari CanalAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नामपूर, ता. सटाणा : शेतातून कालवा जाणार असल्याने तळवाडे भामेर (ता. सटाणा) (Talvade Bhamer) येथील शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. हरणबारी (Haranbari Canal) धरणाच्या पूरपाणी पोहोच कालव्यासाठी बारा वर्षांपूर्वी जमिनी जाऊनही गेल्या बारा वर्षांत कालव्यात पाण्याचा एक थेंबही आला नाही, परंतु शासनाकडून अद्याप एक रुपयाची आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तळवाडे भामेर येथून जवळच असलेल्या मोसम नदीवर हरणबारी नावाचे धरण बांधलेले आहे. तळवाडे भामेर येथे आवळाई नाल्यावर लघु पाटबंधारे विभागाने इरिगेशन टँक (सिंचन तलाव) बांधला आहे. धरणाचे पूरपाणी तळवाडे भामेर येथील तलावामध्ये आणण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून हरणबारी धरणापासून एक डावा कालवा बांधण्याचे काम सुरू आहे, जे अद्याप पूर्ण झालेले नाही.

पोहोच कालव्यासाठी गेल्या १२ वर्षांपूर्वीच तळवाडे भामेर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादन केल्यानंतर कालव्याचे बांधकाम केले गेले. हरणबारी धरणातून डाव्या कालव्याद्वारे पाणी भरण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून डावा कालवा काढण्याचे जे काम सुरू आहे ते अद्याप अपूर्ण आहे. तळवाडे भामेर सिंचन तलावामधून वाटोळी नाल्यावरील बंधाऱ्यात पाणी जाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या कालव्यासाठी तळवाडे भामेर येथील अकरा शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन केले गेले. त्याचा बारा वर्षांपासून आर्थिक मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांना समस्यांचा सामना कारावा लागत आहे.

या कालव्यातून गेल्या १२ वर्षांत पाण्याचा एक थेंबही वाहिलेला नाही. मग सरकारी पैशाचा अपव्यय करून हा कालवा १२ वर्षे आधीच बांधून या जमिनी नापीक करून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेण्याचे प्रयोजन काय, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. कालवा केवळ ठेकेदार व खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने व संबधित व्यक्तींच्या आर्थिक लाभासाठी करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
कालव्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला विनाविलंब मिळावा.
पोहोच कालव्यावर पूल तयार करून शेताच्या दोन्ही बाजू वापरण्या योग्य बनवाव्या.
पोहोच कालव्याचा लवकरात लवकर वापर सुरू करून पाझर तलावात पाणी सोडण्यात यावे.
खोदकामाने खराबा झालेल्या जमिनींचे संधारण करून मिळावे.

गेल्या बारा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनीतून कालवा गेल्याने त्यांच्या जमिनीतीले उत्पप्न घटले, याचे शासनाला, अधिकाऱ्यांना सोयर-सूतक नाही. याबाबत शासन, पाटबंधारे खात्याचे अधिकारी अनभिज्ञ दिसून आले. शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतजमिनींसाठीची मदत तातडीने अदा करावी, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल.
- गोपाळराव गायकवाड, सामजिक कार्यकर्ते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com