Electricity : वीज चोरीविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करणार

गेल्या सहा महिन्यांत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीची ५ हजार ७१९ प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची १ हजार ५९१ प्रकरणे उघड करण्यात आली आहेत.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

पुणे : गेल्या सहा महिन्यांत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात वीज (Electricity ) चोरीची ५ हजार ७१९ प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची १ हजार ५९१ प्रकरणे उघड करण्यात आली आहेत. त्यामुळे वीज चोरी करणाऱ्यांविरोधात यापुढे मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले.

Electricity
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत वीज चोरीविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आली. यात ४७ हजार ५६३ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात १६ कोटी ७ लाख रुपयांची एकूण ५७१९ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली. तर ६ कोटी ४३ लाख रुपयांची १५९१ अनधिकृत वीज वापराची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

वीज चोरीच्या २४६३ प्रकरणांत ८ कोटी ९३ लाख रुपयांची वसुली केली आहे. अनधिकृत वीज वापराच्या ५२४ प्रकरणांत एक कोटी ९० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. पुणे परिमंडळात एकूण ११ हजार ६३६ वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची ९५२ प्रकरणे व वीज चोरीची १५०२ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

Electricity
Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुभा

बारामती परिमंडळात वीज चोरीची ३०२९ प्रकरणे

बारामती परिमंडळात एकूण १२ हजार ६८९ वीज जोडण्या तपासल्या. यात अनधिकृत वीज वापराची २४३ प्रकरणे व वीज चोरीची ३०२९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. कोल्हापूर परिमंडळात एकूण २३ हजार २३८ वीज जोडण्या तपासल्या. त्यात अनधिकृत वीज वापराची ३९६ प्रकरणे व वीज चोरीची १९८८ प्रकरणे उघडकीस आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com