Rabi season : हरभऱ्याचे क्षेत्र जाणार एक लाख हेक्टरवर

अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची वाढती पसंती
Rabi season
Rabi season agrowon
Published on
Updated on

अकोला ः रब्बी हंगामात (Rabi season) हरभऱ्याचे पीक हमखास उत्पादन मिळवून देत असल्याने या पिकाच्या लागवडीकडील कल वाढत आहे. यंदा रब्बीत हरभऱ्याची सुमारे एक लाख १५ हजार हेक्टरपर्यंत लागवड होऊ शकते. या दृष्टीने कृषी विभागाने (Department of Agriculture) नियोजन केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर गव्हाची साडे अठरा हजार हेक्टरवर लागवडीची शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यात खारपाण पट्टा अधिक प्रमाणात आहे. या भागात हरभऱ्याचे उत्पादन चांगले मिळते. शिवाय, या हरभऱ्याची एक वेगळी चव असल्याने बाजारात त्याची मागणीसुद्धा होते. एकरी सात ते आठ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादकता मिळत असल्याने शेतकरी दरवर्षी खरिपातील सोयाबीन काढून झाल्यानंतर हरभऱ्याची पेरणी करीत असतात.

सोयाबीन काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. यामुळे येत्या आठवड्यापासून हरभऱ्याची सार्वत्रिक पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत हरभरा लागवड चांगली समजली जाते. अकोला जिल्ह्यात यंदा १ लाख १५ हजार हेक्टरवर हरभरा लागवड अपेक्षित आहे. यात अकोटमध्ये १४ हजार, तेल्हारा १६५००, बाळापूर १४५००, पातूर ५५००, बार्शीटाकळी १२२०० आणि सर्वाधिक २२१०० हेक्टर लागवड मूर्तिजापूर तालुक्यात होईल, असा अंदाज आहे.

Rabi season
Crop Damage : अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी पन्नास कोटींची मागणी

१८५३० हेक्टरवर होणार गहू

या रब्बी हंगामात गव्हाच्या एकूण १८५३० हेक्टरवर लागवडीचे नियोजन आहे. यात अकोट तालुक्यात २५००, तेल्हारा ५३०, बाळापूर २०००, पातूर २९००, बार्शीटाकळी २६००, मूर्तिजापूर ४००० हेक्टरवर पेरणी होऊ शकते. वास्तविक जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र २१५८८ हेक्टर आहे. मात्र गव्हाची पेरणी हे सरासरी उद्दिष्ट गाठण्याची चिन्हे नसल्याने १८५३० हेक्टरचे नियोजन कृषी खात्याने केले आहे. जिल्ह्यात रब्बीत ज्वारीची ५५०, तर मक्याची २०० हेक्टरवर लागवड होऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com