Rabi Sowing : शेतकऱ्यांचा नव्या पिकांचा प्रयोग करण्याकडे कल

रब्बी हंगामात पारंपरिक गहू, हरभरा या पिकांसोबत मागील काही वर्षांत नवनवीन पिकांची लागवड करण्याकडेही शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon

बुलडाणा ः जिल्ह्यात रब्बी हंगामात (Rabi Season) पारंपरिक गहू, हरभरा (Chana0 या पिकांसोबत मागील काही वर्षांत नवनवीन पिकांची लागवड (New Crop Cultivation) करण्याकडेही शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

या वर्षी चिया, राजमा (Rajma Cultivation) या नवीन पिकांची लागवड काही क्षेत्रांत झाली. शिवाय शेतकरी करडई, सूर्यफूल या पिकांकडेही पुन्हा वळू लागल्याचे स्पष्ट होत आहे.

रब्बी हंगामातील लागवड पूर्ण झालेली आहे. यंदाही हरभरा पिकाची लागवड वाढलेली आहे. या पिकाचे लागवड क्षेत्र दोन लाख चार हजार हेक्टरपर्यंत पोहोचले.

या पाठोपाठ गव्हाची ५३ हजार ४१६ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. मक्याची सुद्धा १२२८१ हेक्टरवर, तर रब्बी ज्वारीची ७९८३ हेक्टरवर पेरणी झाली. रब्बी हंगामासाठी या वर्षी जिल्ह्यात पोषक परिस्थिती होती.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बी हंगामात १५ टक्क्यांनी वाढले पेरणीक्षेत्र

सर्व प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्याने सिंचनाला पाणी मिळत आहे. तसेच पाणीपातळी वाढलेली असून, विहिरींनाही अद्याप पाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांची काढणी करून रब्बी लागवडीला पसंती दिली.

रब्बी हंगामात हरभरा या प्रमुख पिकावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. बहुतांश शेतकरी दरवर्षी हरभऱ्याची लागवड करून चांगले उत्पादनही काढत आहेत.

Rabi Sowing
Rabi Sowing : साखरखेर्डा परिसरात रब्बी लागवडीत मोठी वाढ

चिया पिकाची धरली कास

मागील दोन-तीन हंगामांपासून काही शेतकरी नवनवीन पिकांच्या लागवडीकडेही झुकू लागले आहेत. या वर्षी काही शेतकऱ्यांनी चिया या नव्या पिकाची कास धरली. साखरखेर्डा येथील प्रयोगशील शेतकरी दत्ता राऊत यांनी तीन ते चार एकरांत या पिकाची करार पद्धतीने लागवड केली.

पीक अत्यंत जोमदार वाढले असून, चांगल्या उत्पादनाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. काही शेतकऱ्यांनी करडई, सूर्यफुलाच्या लागवडीलाही पुन्हा पसंती दिली आहे. ही पिके सध्या दुर्मीळ होत चालली आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने करडई महत्त्वाची मानली जाते. यंदा सुमारे ४०० हेक्टरपर्यंत लागवड झालेली आहे. सूर्यफुलालाही मागणी असते. आधी सूर्यफुलाचे जिल्ह्यात मोठे क्षेत्र होते. मध्यंतरी हे पीक मागे पडले. आता पुन्हा लागवड होत आहे. यंदा ९० हेक्टरपर्यंत लागवड झालेली आहे.

पीक...लागवड

गहू...५३४१६

मका...१२२८१

ज्वारी...७९८३

हरभरा...२०४५४३

करडई...३९१

सूर्यफूल...८९ हेक्टर

मागील हंगामातही चिया पिकाची लागवड केली होती. यंदा हे क्षेत्र वाढविले. कंपनीसोबत १८ हजार रुपये क्विंटलचा करार केला आहे. एकरी किमान ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन येईल, असे पीक जोमदार आहे.

-- दत्ता राऊत, शेतकरी, साखरखेर्डा, जि. बुलडाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com