Agriculture Technology : ‘केव्हीके’ मार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा

परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये शुक्रवारी (ता. २७) आयोजित शास्त्रीय सल्लागार समिती आढावा बैठकीत ते बोलत होते.
KVK
KVKAgrowon

परभणी ः कृषी विज्ञान केंद्रामार्फत (Krishi Vigyan Kendra) नवीन तंत्रज्ञान (Agriculture Technology) तसेच विविध पिकांच्या नवीन वाणांचा (News Crop Verity) प्रसार आणि प्रचार प्रभावीपणे झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांची प्रगती (Farmers Progress) होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी केले.

परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये शुक्रवारी (ता. २७) आयोजित शास्त्रीय सल्लागार समिती आढावा बैठकीत ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी लक्ष्मी देशमुख होत्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक पी. बी. बनसावडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुनील हट्टेकर, बाळासाहेब झिंजार्डे, शेतकरी प्रतिनिधी मोहन कापसे, पंडित थोरात, रमेश पवार, अर्चना शिराळ आदी उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधी दरम्यान घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा संक्षिप्त अहवाल आणि २०२३ या वर्षाचा वार्षिक कृती आराखडा सादर करण्यात आला.

कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी विशेष उपक्रम, पीक प्रक्षेत्र चाचणी, आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक, प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रम तसेच प्रक्षेत्रावरील विविध प्रकल्पांच्या उत्पादनांची माहिती सादर केली.

KVK
Agriculture Award : नारायणगाव ‘केव्हीके’तील प्रशिक्षण घेतलेल्या दोन उद्योजकांचा दिल्लीत गौरव

डॉ.नेमाडे म्हणाले, की कृत्रिम रेतनाचे नवीन तंत्रज्ञान, लम्पी आजारापुर्वीची काळजी, जनावरांचे पशुखाद्य व चारा व्यवस्थापन तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत व्हावी, असे ते म्हणाले . सूत्रसंचालन डॉ.अरुणा खरवडे यांनी केले तर आभार अमित तुपे यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com