Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागात कामांचा खोळंबा

जिल्ह्यात पशूधन वाढावे यासाठी पशुसंवर्धन विभागातील वर्ग तीन व चारमधील कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते.
Department Of Animal Husbandry
Department Of Animal HusbandryAgrowon

अलिबाग, ता. २९ (बातमीदार) ः जिल्ह्यात पशूधन वाढावे यासाठी पशुसंवर्धन विभागातील (Department of Animal Husbandry) वर्ग तीन व चारमधील कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. परंतु, सरकारने खासगीकरण (Privatization) आणि भरती प्रक्रियाच बंद केल्याने आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने पशुसंवर्धन विभागाच्या कामाकाजावर परिणाम झाला आहे.

Department Of Animal Husbandry
Animal Husbandry Department : पशुसंवर्धन विभागाला पदोन्नतीचे वावडे

रायगड जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या अखत्यारित येणारे पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. जिल्ह्यात २२ पशुसंवर्धन विभागाची दवाखाने आहेत. या दवाखान्यांमार्फत पशुधनांची निगा राखण्याचे काम केले जाते. पशुधन वाढवण्याबरोबरच पशुधनाबाबत असलेल्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना पशुपालकांपर्यंत पोहचविण्याचे काम वर्ग तीन व वर्ग चारचे कर्मचारी करतात.

लिपिक, टंकलेखक, वाहन चालक, शिपाई, परिचर, स्वच्छक अशा वेगवेगळ्या पदावर जिल्ह्यात ४५ कर्मचारी कार्यरत आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यापासून पशुधनांची निगा राखणे अशी अनेक कामे या कर्मचाऱ्यांद्वारे केली जातात. मात्र ही पदेच रद्द करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. वर्ग तीन व वर्ग चारची ३५ टक्के पदे निरस करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. भरती करण्यास टाळाटाळ सरकार करीत असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अपुऱ्या मनुष्यबळामुळे सध्या जिल्ह्यात असलेल्या लंपीरोगाच्या प्रादुर्भावाचा धोका तसेच पशुधन वाढीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता वर्तवली जात आहे.

शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यामध्ये या कर्मचाऱ्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रस्तावित सुधारित आकृतीबंधामधील पदे निरास करण्याचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सोमवारपासून सुरु केले आहे. जिल्ह्यातील एकूण २२ दवाखान्यांसमोर हे आंदोलन सुरु आहे.- महेश फुलारे, अध्यक्ष, पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ शाखा रायगड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com