
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली, तरी सभापतिपद देण्यास काँग्रेसकडून सातत्याने नकार दिला जात असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना फोन लावला. त्यानंतर राष्ट्रवादीचे बाळू जोध यांचे नाव सभापतिपदासाठी जाहीर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या चार सभापतिंसाठी मंगळवारी (ता. १) निवडणूक झाली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे सर्व सदस्य एकाच ठिकाणी होते. काँग्रेसने सभापतिपदासाठी आपल्या उमेदवाराची नावे जाहीर केली; मात्र राष्ट्रवादीकडून वेगवेगळ्या नावांचे प्रस्ताव येत होते.
त्यावर कोणाचेच एकमत होत नव्हते. केदार शेकापचे समीर उमप यांच्यासाठी आग्रही होते. त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा मिळाली होती; मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा यास विरोध होता.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने उपाध्यक्षपद देण्याची मागणी केली; मात्र ती केदारांनी फेटाळून लावली होती. त्यानंतर सभापतिपदही देण्यास नकार दिला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.