Sugarcane Recovery : परळी वैजनाथमध्ये उसाचा एकरी उतारा घटला

यंदा साखर कारखाने उशिरा सुरू होऊनही उसाची तोडणी मात्र लवकर संपत आहे. तथापि उसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

सिरसाळा : यंदा साखर कारखाने (Sugar Mills) उशिरा सुरू होऊनही उसाची तोडणी (Sugarcane Harvesting) मात्र लवकर संपत आहे. तथापि उसाच्या उत्पादनात (Sugarcane Production) मोठी घट झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा परळी वैजनाथ तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टरवर उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करण्यात आली आहे.

Sugarcane
Sugarcane Crushing : मराठवाड्यात ९८ लाख ४५ हजार टन उसाचे गाळप

गेल्या दोन वर्षांपासून पाऊस चांगला होत असल्याने पाणी पातळीत वाढ झाली. तालुक्यातील पौळ पिंपरी, आचार्य टाकळी, पिंपळगाव गाढे, जयगाव, कासारवाडी, पोहनेर, जळगव्हाण, सिरसाळा या ठिकाणी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून उसाची लागवड केली आहे.

ऊस लागवडीसाठी नांगरणी, रोटर, सरी, बेणे, मजुरी, खताचे वाढलेले भाव, तणनाशक फवारणी असा मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला. पिकाला वन्यप्राण्यांचा त्रास, उन्नी रोग, लोकरी माव्याचा प्रादुर्भाव तसेच शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांना मेहनतच करता आली नाही.

Sugarcane
Sugarcane FRP : ‘एफआरपी’चे ५७८ कोटी रुपये थकीत

दरम्यान उसाला एकरी ३० ते ३२ टन उतारा येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी मजुरांचा अभाव असल्याने शेतकरी ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती देत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात वैजनाथ साखर कारखाना, लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखाना, ट्वेंटी शुगर सायखेडा, बजाज कारखाना, गंगाखेड शुगर, अंबासाखर हे कारखाने कॉमन झोन क्षेत्रात ओळखले जातात. त्यामुळे सर्वच कारखान्यांची तोडणीसाठी चढाओढ सुरू आहे.

प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर द्या

यंदा लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याने उसाला प्रतिटन तीन हजाराच्या जवळपास भाव जाहीर केल्याने शेतकरी या कारखान्याला ऊस देण्यासाठी प्राधान्य देत आहेत.

अनेक साखर कारखाने उसापासून इथेनॉल, वीज आदी प्रॉडक्ट तयार करत असल्याने मोठा फायदा होत आहे. त्यामुळे उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com