Sugarcane FRP : सोलापुरात ‘एफआरपी’ मिळेना

यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३७ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ अशा एकूण ५० कारखान्यांनी विभागात गाळप हंगाम घेतला आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRP Agrowon
Published on
Updated on

Sugarcane Crushing Season 2023 ः सोलापूर विभागातील ५० साखर कारखान्यांकडून यंदाच्या हंगामातील ३१ जानेवारीपर्यंतचे ‘एफआरपी’चे (Sugarcane FRP) बेसिक रिकव्हरीप्रमाणे २८३०.८० कोटी रुपये रक्कम ऊसबिलाच्या स्वरुपात शेतकऱ्यांना मिळाले.

पण यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला, तरी शेतकऱ्यांना अद्यापही एफआरपी (FRP) मिळू शकलेली नाही. यंदाच्या हंगामातील आतापर्यंत ७८६.६९ कोटी रुपये एफआरपीचे कारखान्यांकडे थकीत आहेत.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : ‘एफआरपी’चे ५७८ कोटी रुपये थकीत

यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३७ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ अशा एकूण ५० कारखान्यांनी विभागात गाळप हंगाम घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे २२४०.०३ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी ५९०.७७ कोटी रुपये जानेवारीअखेर दिले आहेत.

असे असले तरीही सोलापूर जिल्ह्यातील २९ कारखान्यांकडे एफआरपीचे ६९६.९१ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ कारखान्यांकडे ८९.७८ कोटी रुपये थकीत आहेत. श्री शंकर(सदाशिवनगर), गोकुळ शुगर्स (उस्मानाबाद) या कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंतचा एफआरपी अहवाल सोलापूर साखर सहसंचालकांकडे सादर केलेला नाही. अनेक कारखान्यांनी ५० टक्के पेक्षाही कमी एफआरपी दिली आहे.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : ‘एफआरपी’बाबतचे गोड गैरसमज

‘एफआरपी’साठी हवी नियमावली

पुढील हंगाम चालू व्हायची वेळ आली तरीही एफआरपीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. साखर आयुक्तालयाने पंधरवड्याचा एफआरपी अहवाल घेताना कारखान्यांसाठी नियमावली तयार करून त्यासाठी यंत्रणा उभारायला हवी.

कारखान्यांनी प्रत्येक पंधरवड्यात ऊसबिलाच्या याद्या बँकांना देऊन त्या बँकांकडून प्रमाणित करून घेण्याचे बंधन घालायला हवे, अशा प्रमाणित केलेल्या याद्याच साखर आयुक्तालयाने स्वीकारायला हव्यात.

जेणेकरून कारखान्यांनी प्रत्येक पंधरवड्यात दिलेली एफआरपी व थकीत एफआरपीचा वस्तुनिष्ठ आकडा समोर येईल व शेतकऱ्यांना वेळच्यावेळी एफआरपी मिळेल.

कारखानानिहाय ३१ जानेवारीअखेर थकीत एफआरपी (कोटी रुपयांत)

सोलापूर जिल्हा :

सिद्धेश्वर-२५.३२, संत दामाजी-१३.१०, श्री मकाई-२०.२९, संत कुर्मदास-१३.१०, सासवड माळी-१५.०, लोकमंगल (बीबीदारफळ)-८.३८, लोकमंगल (भंडारकवठे)-२३.६३, सिद्धनाथ-४९.२१, जकराया-१४.०८, इंद्रेश्वर-१२.५३, भैरवनाथ (विहाळ)-३३.१६, भैरवनाथ (लवंगी)-३५.४३, युटोपियन-२८.८४, मातोश्री शुगर-१९.२९, भैरवनाथ (आलेगाव)-१९.४३, बबनरावजी शिंदे- १३.६७, ओंकार-०.३२, जयहिंद-१४.३७, विठ्ठल रिफाइंड-४१.६२, आष्टी शुगर-९.४६, भीमा-४८.०३, सहकार शिरोमणी-३६.२६, सीताराम महाराज-२.४२, धाराशिव (सांगोला)-१५.५३, श्री शंकर-३१.७१, आवताडे शुगर्स-२४.०७, विठ्ठल (गुरसाळे)-५५.९१, येडेश्वरी-४.९०.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : राज्यातील १२२ कारखान्यांनी ‘एफआरपी’ थकविली

उस्मानाबाद जिल्हा :

विठ्ठलसाई-१४.१४, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-२.३१, भैरवनाथ (वाशी)-१०.६७, धाराशिव (कळंब)-१३.७०, भैरवनाथ (सोनारी)-२५.७३, लोकमंगल माऊली-१९.४४, क्यूनर्जी-२.८८, डीडीएनएसएफए-०.९१.

यंदा उसाचे क्षेत्र कमी होते. शेतकऱ्यांनाही उसाचे म्हणावे तसे एकरी उत्पादन मिळाले नाही. ऊस मिळविण्यासाठी कारखानदारांमध्ये दराची स्पर्धा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. उलट थकीत एफआरपी वाढतच गेली आहे. थकीत एफआरपीसाठी लवकरच आंदोलन करू.
विजय रणदिवे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर
Sugarcane FRP
Sugarcane FRP : नगर विभागात २९० कोटी एफआरपीची प्रतीक्षा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com