Sugarcane Season : मराठवाड्यातील आठ कारखान्यांचा हंगाम गुंडाळला

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६२ कारखान्यांनी यंदाच्या ऊसगाळप हंगामात सहभाग नोंदविला आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon
Published on
Updated on

Sugarcane Crushing Season छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६२ कारखान्यांनी यंदाच्या ऊसगाळप हंगामात (Sugarcane Crushing Season) सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी ८ कारखान्यांचा गाळप हंगाम गुंडाळला आहे.

सहभागी कारखान्यांनी ९ मार्चअखेर २ कोटी १२ लाख ४१ हजार १५५ क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यातील ज्या ६२ कारखान्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये धाराशिवमधील १३, छत्रपती संभाजीनगर व परभणीमधील प्रत्येकी ७, जालन्यातील ५, बीडमधील ८, हिंगोलीतील ५, नांदेडमधील ६ व लातूरमधील ११ कारखान्यांचा समावेश आहे.

या कारखान्यांपैकी ९ मार्चअखेर ८ कारखान्यांचा गाळप हंगाम गुंडाळला आहे. त्यामध्ये हिंगोली व लातूरमधील प्रत्येकी एक, नांदेडमधील २, तर धाराशिवमधील ४ कारखान्यांचा समावेश आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing Season : राज्यातील साखर हंगाम लवकरच आटोपणार

जिल्हा : धाराशिव

कारखाने : १३

ऊसगाळप : ४८,०५,४८३ टन

साखर उत्पादन : ४३,२१,९५५ क्विंटल

उतारा : ८.९९ टक्के

जिल्हा : छत्रपती संभाजीनगर

कारखाने : ७

ऊसगाळप : १९,२२,१६० टन

साखर उत्पादन ः २०,२२,३०५ क्विंटल

उतारा : १०.५२ टक्के

जिल्हा : जालना

कारखाने : ५

ऊसगाळप : २०,२१,३७० टन

साखर उत्पादन : २०,६४,१५० क्विंटल

उतारा : १०.२१ टक्के

जिल्हा : बीड

कारखाने : ८

ऊसगाळप : ३७,८७,१३७ टन

साखर उत्पादन : २८,६८,८२० क्विंटल

उतारा : ७.५८ टक्के

Sugarcane Crushing
Sugarcane Season : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे

जिल्हा : परभणी

कारखाने : ७

ऊसगाळप : २७,४०,०९५ टन

साखर उत्पादन: २७,१५,४४० क्विंटल

उतारा : ९.९१ टक्के

जिल्हा : हिंगोली

कारखाने : ५

ऊसगाळप : १५,०६,९३६ टन

साखर उत्पादन: १५,७३,५८० क्विंटल

उतारा : १०.४४ टक्के

जिल्हा : नांदेड

कारखाने : ६

ऊसगाळप : १७,५९,६२३ टन

साखर उत्पादन : १७,५९,३०५ क्विंटल

उतारा : १० टक्के

जिल्हा : लातूर

कारखाने : ११

ऊसगाळप : ३७,१७,४७४ टन

साखर उत्पादन : ३९,१५,६०० क्विंटल

उतारा : १० टक्के

पाच जिल्ह्यांतील

साखर उतारा १० टक्के

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सरासरी साखर उतारा १० टक्के वा त्यापुढे राहिला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली व लातूर जिल्ह्यांतील कारखान्यांचा सरासरी साखर उताऱ्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सर्वांत कमी म्हणजे ७.५८ टक्के इतकाच राहिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com