Sugarcane Crushing : खानदेशात ऊसगाळप १३ लाख टनांवर

खानदेशात यंदा ऊसगाळपात पाऊस किंवा इतर समस्यांमुळे कुठेही व्यत्यय आलेला नाही. सहा साखर कारखाने वेगात सुरू आहेत. यामुळे गाळपासाठी उसाला उठाव आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः खानदेशात यंदा ऊसगाळपात (Sugarcane Crushing) पाऊस किंवा इतर समस्यांमुळे कुठेही व्यत्यय आलेला नाही. सहा साखर कारखाने (Sugar Mill) वेगात सुरू आहेत. यामुळे गाळपासाठी उसाला उठाव आहे. गाळप वेगात सुरू आहे. १३ लाख टनांवर ऊसगाळप झाल्याची माहिती आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Harvesting : चंदगडमधील उसाची प्राधान्याने उचल करा

यंदा मार्चअखेरीस गाळप पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. उसाची लागवड नंदुरबारात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यातही सुमारे ११ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. तर धुळ्यातही सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवर ऊस आहे. धुळ्यात शिरपूर व साक्री तालुक्यात ऊस आहे.

नंदुरबारात तळोदा, शहादा, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यांत ऊस आहे. जळगावात चाळीसगाव भागात सर्वाधिक ऊस आहे. तसेच यावल, मुक्ताईनगर, चोपडा या भागांतही ऊस पीक आहे. ऊसगाळपास वेग आला आहे. कारण यंदा तोडणी सर्वत्र सातत्याने सुरू आहे. पाऊस किंवा इतर अडचणी आलेल्या नाहीत.

Sugarcane Crushing
Sugarcane Farming : ऊस उत्पादकांची अगतिकता

यंदा तोडणी उशिरा सुरू झाली. मात्र कारखाने सहा सुरू आहेत. त्यामुळे गाळप १२ लाख टनांवर झाले आहे. मागील हंगामात मार्चअखेरीसही १२ लाख टन ऊस गाळप झालेले नव्हते.

शिवाय चाळीसगाव, साक्री, शिरपूर भागांत बाहेरील कारखान्यांनी ऊस खरेदी किंवा तोडणी केली होती. यंदा फक्त साक्री तालुक्यात नाशिकमधील कारखाने ऊसतोडणी करीत आहेत. इतर भागांत खानदेशातील कारखाने ऊसतोडणी करीत आहेत.

सर्वाधिक गाळप नंदुरबारातील कारखान्यांनी केले आहे. नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील खासगी कारखाना गाळपात खानदेशात आघाडीवर आहे. या कारखान्यातील गाळप साडेपाच लाख टनांवर पोहोचले आहे.

या कारखान्याने यंदा १० लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापाठोपाठ मुक्ताईनगर, चोपडा, नवापूर येथील कारखान्यांचे गाळप वेगात झाले आहे. मुक्ताईनगर येथील खासगी कारखाना खानदेशात ऊसगाळपात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com