Sugar Rate : बाजारात साखरेचे दर स्‍थिर

Sugar Prices : प्रतिक्विंटल ३५०० ते ३६०० रुपये दर
Sugar
SugarAgrowon
Published on
Updated on

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar Market : कोल्हापूर ः देशांतर्गत बाजारात साखरेचे दर स्‍थिरच आहेत. सध्या मागणी फारशी नसल्‍याने दरात फारशी सुधारणा होत नसल्याची स्थिती आहे. सध्या साखरदर प्रतिक्विंटल ३५०० ते ३६०० रुपयांच्या आसपास आहेत. येत्या काही दिवसांत सण सुरू झाल्‍यानंतर मागणी आणि दरातही काहीशी वाढ होऊ शकते, असा अंदाज साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यापासून केंद्र शासन मागणी व पुरवठ्यात समन्वय राखण्‍यासाठी प्रयत्न करत आहे. कारखान्यांकडून केंद्राच्या वतीने सातत्याने माहिती मागवण्यात येत आहे. शिल्लक साठा व विक्रीची माहीती घेऊन पुढील महिन्याला यानुसार कोटे देण्यात येत असल्याने साखर विक्री करताना कारखान्यांवर फारसा दबाव येत नसल्याचे चित्र आहे. पण जूनच्या तुलनेत जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहातही दरात फारशी सुधारणा झाली नाही. पाऊस सुरू झाल्‍यानंतर साखरेच्या मागणीत काहीशी घट झाली. त्याचवेळी वाढणारे साखरेचे दरही नरमले. ऑगस्टपासून पावसाने देशात बहुतांश ठिकाणी विश्रांती घेतली. यानंतर काही प्रमाणात साखरेची मागणी व दरही वाढतील, अशी शक्यता होती. परंतु अद्याप मागणीत फारशी वाढ नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. सणासुदीसाठी अजूनही वेगाने खरेदी सुरू नाही. केंद्रानेही विक्री धीमी असल्याचे लक्षात घेऊन जुलैचा कोटा १५ ऑगस्टपर्यंत विक्री करण्‍यास परवानगी देऊन कारखान्यांना साखर विक्रीसाठी वेळ दिला आहे.

Sugar
Sugar Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर दबावात

जगात साखरेच्या किमतीत मोठी वाढ असताना स्थानिक पातळीवर मात्र दरात फारशी सुधारणा नसल्याचे चित्र आहे. निर्यातीला परवानगी नसल्याने साखर बाजाराची उलाढाल केवळ स्थानिक मागणीवरच अवलंबून रहात आहे. येत्या काही दिवसांत सण असल्याने याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या मागणीवर होऊ शकेल, असा आशावाद साखर उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

देशांतर्गत साखरेचे दर प्रकारानुसार प्रतिक्‍विंटल रुपये
राज्य एस ३० एम ३०
महाराष्ट्र ३५१०-३५६० ३६१०-३६६०
कर्नाटक ३५६०-३६०० ३६५०-३६५०
उत्तर प्रदेश - ३६५०-३७३०
गुजरात ३५५१-३५८१ ३६४१-३६७१
तमिळनाडू ३५९०-३७०० ३७१०- ३७५०
मध्य प्रदेश ३६३०-३७३० ३६७०-३८००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com