Tiger Terror in Bhandara: पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाघीण जेरबंद

मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील शेतशिवारातील मिरचीच्या बागेत दोन दिवसांपासून ठाण मांडलेल्या वाघिणीला वनविभागाने अखेर जेरबंद केले.
Tiger Terror in Bhandara
Tiger Terror in BhandaraAgrowon
Published on
Updated on

मोहाडी, जि. भंडारा : मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील शेतशिवारातील मिरचीच्या बागेत दोन दिवसांपासून ठाण मांडलेल्या वाघिणीला (Tigress) वनविभागाने (Forest Department) अखेर जेरबंद केले. वनकर्मचारी व पोलिस यांच्या पाच तास चाललेल्या ‘जॉइंट रेस्क्यू ऑपरेशन’नंतर या वाघिणीला पकडण्यात आले. त्यामुळे वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.(Tiger Terror in Bhandara)

Tiger Terror in Bhandara
Leopard Attack : बिबट्याने पाडला गाय, हरणाचा फडशा

मांडेसर- कान्हळगाव शेतशिवारात मागील आठवड्यात काही शेतकऱ्यांना वाघ दिसल्याचे सांगण्यात आले होते. वन कर्मचाऱ्यांनी त्याची शहानिशा केली असता त्यांना वाघाची पदचिन्हे आढळून आली होती. त्यामुळे भीतीमुळे परिसरातील शेतशिवारात शेतकरी व मजुरांनी जाणे बंद केले होते.

मांडेसर येथील वालचंद दमाहे यांच्या शेतात या वाघिणीने दोन दिवसांपासून तळ ठोकला होता. दोन दिवसांपूर्वी या वाघिणीने मांडेसर-कान्हाळगांव रस्त्यालगत शेखर कस्तुरे यांच्या शेतात एका रानडुकराची शिकार केली होती.

बुधवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेदरम्यान ही वाघीण अनेकांना मांडेसर परिसरातील बालचंद दमाहे याच्या शेतात दिसून आली. त्यामुळे परिसरातील लोकांनी या भागात प्रचंड गर्दी केली होती.

Tiger Terror in Bhandara
Tiger Attack : नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

वन विभागाला सूचना मिळताच भंडारा व गोंदिया वन विभाग, नागझिरा नावेगाव व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱ्यांनी आंधळगाव पोलिसांच्या मदतीने वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात वाघिणीला पकडण्याचे संयुक्त ऑपरेशन सुरू केले.

वाघिणीच्या ठिकाणापासून वन क्षेत्र जवळपास २० किमी अंतरावर असल्याने वाघिणीला जेरबंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. दुपारी ११ नंतर वाघिणीला पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली.

अखेर सायंकाळी ४.३० वाजता वन विभागाच्या तज्ज्ञांद्वारे वाघिणीला बंदुकीच्या साह्याने बेशुद्धीचे इंजेक्शन देत यशस्वीरीत्या जेरबंद केले.

वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असताना त्या भागात प्रचंड गर्दी जमली होती. त्यांच्या गोंगाटामुळे वाघ पकडण्यात अडचण येत होती. या गर्दीला थोपविण्याची कसरतही वन विभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांना करावी लागली. त्यानंतरच पाच तासांच्या अथक प्रयत्नांती वाघिणीला पकडण्यात यश आले.

जेरबंद केल्यानंतर वाघिणीला पिंजऱ्यातून तुमसर भागातील चिचोली लाकूड आगार येथे नेण्यात आले आहे. मध्यरात्री उशिरा वाघिणीला तिच्या अधिवासात सोडण्याची कारवाई करण्यात येईल.

- राहुल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com