Honey Market : मधखरेदी दरात भरीव वाढ

महाबळेश्‍वर येथे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि राज्य औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय मधूमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
Honey
HoneyAgrowon

Honey Market Rate सातारा ः लाभार्थींनी उत्पादित केलेले मध (Honey Production) व मेणाची खरेदी (Wax Procurement) मंडळ हमी भावाने (Honey MSP) करत आहे. नुकतेच मंडळाने खरेदीच्या हमीभावात वाढ केली आहे. आता सेंद्रिय ()Organic Honey ५०० रुपये, सातेरी मध ४०० रुपये किलो तर मेण खरेदी ३०० रुपये किलो, मेलिफेरा मध २०० रुपये किलो इतका दर वाढविण्यात आला आहे.

सातेरी मध माशा वसाहती खरेदी दर तीन हजार रुपये प्रति वसाहत या प्रमाणे खरेदीचा दर वाढविण्यात आला आहे. जास्तीत जास्त मधपाळांनी मंडळाकडे मध विक्री करावी, असे आवाहन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले आहे.

Honey
Honey Production : मधाचे गाव ‘मधुमित्र’उपक्रम राज्यभर सुरू करणार

महाबळेश्‍वर येथे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि राज्य औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय मधूमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

त्या वेळी श्री. साठे बोलत होते. श्री. साठे म्हणाले, की मधमाशीला राज्य कीटकाचा दर्जा मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे.

मधमाशीचे पर परागी करणाद्वारे होणारी कृषी उत्पादनातील वाढ व त्यामधे मधमाश्‍यांचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेता मधमाशी उद्योग महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन केले.

Honey
Honey Village : ‘मधाचे गाव’ समृद्ध गावाच्या दिशेने एक पाऊल

या वेळी साठे म्हणाले, की सातेरी मधमाश्‍या वसाहतीचा दर २७०० रुपयांवरून ३००० रुपये करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. औषधी वनस्पती मंडळाचे उपसंचालक प्रवीण गवांदे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना बद्दलची माहिती दिली.

संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील म्हणाले, की मध उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मधमाशीपालन करणे व त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी तेजदीप ढगे, तालुका कृषी अधिकारी नितीन पवार, समीर पवार, निसार तांबोळी, संजय पार्टे, मधूसागर अध्यक्ष नाना जाधव आदी उपस्थित होते.

मध खरेदीचे सुधारित दर (प्रतिकिलो, रुपयांत)

मधाचा प्रकार---अगोदरचे दर---आताचे दर

सेंद्रिय मध---४००---५००

सातेरी मध---३४५---४००

मेलिफेरा---१७०---२००

मेण---१७०---३००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com