Savitri River : सावित्रीसह उपनद्या गाळमुक्त होणार

महाड शहरामध्ये येणारा पूर तसेच परिसरामध्ये निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती याबाबत आपत्ती सौमीकरण आराखडा सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे.
River Savitri
River SavitriAgrowon

महाड : सावित्री (Savitri River) आणि तिच्यावर उपनद्यांमधील गाळ काढण्याच्या कामासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी पाच कोटी रुपयांचा पहिला हप्ता येत्या दोन दिवसांत उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे काही दिवसांत सावित्रीसह उपनद्यांतील (River Sludge) गाळ काढण्यात येणार असल्याने महाड शहरामधील पूरस्थितीवर नियंत्रण (Flood control) मिळवता येणार आहे.

महाड शहरामध्ये येणारा पूर तसेच परिसरामध्ये निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती याबाबत आपत्ती सौमीकरण आराखडा सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे.

सावित्री आणि तिच्या उपनद्यांमधील गाळ काढण्यासाठी ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मागील वर्षी नदीतील गाळ काही प्रमाणात काढल्याने पुराचा धोका कमी झाला होता.

अशा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने ते संबंधित विभागाला देण्यात आले आहे. पुढील काही दिवसांतच पाच कोटी रुपयांचा पहिला हप्ता गाळ काढण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले.

महाड व पोलादपूर तालुक्यातील आपत्कालीन परिस्थिती कमी करण्याकरता विविध आराखडे तयार करण्यात आले आहेत.

यामध्ये महाड तालुक्यातील जुई येथील खार प्रतिबंधक बंधारे दुरुस्ती, महाड तालुक्यातील सरकारी जागेवर १४, तर खासगी जागांवर ५३; तसेच पोलादपूर तालुक्यात सरकारी जागांवर २१ आणि खासगी जागांवर ३३ निवारा शेड बांधण्याचे काम प्रस्तावित आहे.

River Savitri
Village Memories : ...आणि नदी वहायची थांबली!

त्यामुळे दरडग्रस्तांना आपत्काळात निवारा उपलब्ध होऊ शकेल. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होऊ नये, याकरता महाड व पोलादपूरमध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्याचीही उपाययोजना केली जात आहे.

मोबाईल टॉवरची उभारणी

भारत संचार निगमची सेवा सुरळीत करण्यासाठी तीन मोबाईल टॉवर प्रस्तावित करण्यात आले आहेत. रायगड किल्ल्यावरही मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी मिळावी, यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती प्रतिमा पुदलवाड यांनी यावेळी दिली. भारत संचार निगमकडून भूमिगत ऑप्टिकल केबल टाकण्याचे कामही प्रस्तावित आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com