School Mobile : शालेय वेळेत विद्यार्थ्यांना मोबाइल वापरास बंदी

शैक्षणिक प्रगतीत मागे पडण्याबरोबरच मूल्यहीन संस्कार त्यांच्यावर होऊ लागले आहेत. हे सगळे धोके वेळीच ओळखत दहिवडच्या ग्रामस्थांनी शाळेत मोबाइल बंदीचा निर्णय घेतला आहे.
School Mobile
School MobileAgrowon
Published on
Updated on

देवळा, जि. नाशिक : शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी (School Student) सोबत मोबाइल आणू नये आणि आणला तरी तो शालेय वेळेत मोबाइलचा वापर करू (Mobile) नये, असा निर्णय देवळा तालुक्यातील (Devla Taluka) दहिवड ग्रामस्थांनी घेतला आहे.

त्यानुसार ग्रामस्थांच्या सह्या असणाऱ्या आशयाची निवेदने गावातील सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आली. त्यावर याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे सर्व शाळांच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइलचा चांगल्या दृष्टीने वापर होण्याऐवजी मोबाइल वापराचे दुष्परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. अनेक विद्यार्थी अभ्यास न करता मोबाइलवर गेम खेळणे, पिक्चर तसेच इतर विचित्र व्हिडिओ पाहणे यात रममाण होतात.

यामुळे शैक्षणिक प्रगतीत मागे पडण्याबरोबरच मूल्यहीन संस्कार त्यांच्यावर होऊ लागले आहेत. हे सगळे धोके वेळीच ओळखत दहिवडच्या ग्रामस्थांनी शाळेत मोबाइल बंदीचा निर्णय घेतला आहे.

School Mobile
Mobile Ban : देगावात रोज सायंकाळी दोन तास टीव्ही, मोबाईल बंद

विद्यार्थी शाळेत मोबाइल आणणार नाही आणि आणला तरी त्याचा वापर करू शकणार नाही यावर लक्ष केंद्रित केले आहे.

या निर्णयानुसार येथील जिल्हा परिषद शाळा, (कै) लक्ष्मीबाई देवरे विद्यालय, जिजामाता माध्यमिक विद्यालय, आदिवासी आश्रमशाळा दहिवड तसेच आर. जी. बी. कॉलेज यांना निवेदने देण्यात आली.

शालेय वेळेत विद्यार्थी मोबाइल आणत असतील तर ते जप्त करून शाळा सुटल्यावर देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे सुचविण्यात आले आहे. त्यासाठी देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे.

मोबाइल वापराचे अनेक फायदे असले तरी विद्यार्थी वर्ग त्याचा दुरुपयोग करत असल्याचे सिद्ध होत आहे. आता पालकांनीही आपल्या मुलांकडे मोबाइल वापर करतेवेळी लक्ष ठेवण्याची गरज आहे.
संजय देवरे, ग्रामस्थ
तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजच्या नावाने येणाऱ्या मुलींचा मोबाइल पालकांनी तपासायला हवा. आपली मुलगी कोणाच्या संगतीत आहे, व्हॉट्सॲपवर कोणाशी चर्चा करते, तिचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत याबाबत दक्ष राहायला हवे. मोबाइलचा वापर कसा आणि कशासाठी होतो याकडे लक्ष असू द्या.
पुरुषोत्तम शिरसाट, सहायक पोलीस निरीक्षक, देवळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com