Kolhapur Water Issue : तर आम्ही कर्नाटकात सामील होणार, कोल्हापूरच्या दूधगंगा नदीच्या पाणीप्रश्नी गावकरी आक्रमक

Ichalkaranji Municipal Corporation : कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी महानगरपालिका असलेल्या इचलकरंजी शहराचा मागच्या कित्येक वर्षांपासून पिण्याचा पाण्याच्या प्रश्नावरून वाद सुरू आहे.
Ichalkaranji Municipal Corporation
Ichalkaranji Municipal Corporationagrowon
Published on
Updated on

Ichalkaranji Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी महानगरपालिका असलेल्या इचलकरंजी शहराचा मागच्या कित्येक वर्षांपासून पाणी प्रश्नावरून वाद सुरू आहे. दरम्यान सुळकूड येथील दूधगंगा नदीवरून इचलकरंजीसाठी पाणी योजना सुरू करण्याच्या प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. यावरून आता दूधगंगा बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे.

सुळकूड, कसबा सांगाव, मौजे सांगाव, रणदिवेवाडीसह अन्य गावे कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव करण्याच्या तयारीत आहेत. दूधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या पार्श्वभूमीवर योजना रद्द न झाल्यास नदीकाठची सर्व गावे कर्नाटक राज्यात जाण्याचा ठराव करण्याच्या तयारीत आहेत.

याबाबत दूधगंगा बचाव कृती समितीने सुळकूड येते झालेल्या बैठकीत इशारा दिला. येत्या पंधरा दिवसांत विविध ठराव करून योजनेविरोधात तीव्र लढाई करण्याचा निर्धारही करण्यात कृती समितीने केला आहे.

जिल्हाधिकारी आणि कागल पाटबंधारे विभागाकडून सुळकूड ग्रामपंचायतीस पाण्याच्या आकडेवारीचे पत्र मिळाले आहे. यावरून नदीकाठच्या गावांत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. भूमिपुत्रांना डावलून, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भविष्यातील अडचणी समजून न घेता प्रस्तावित योजनेस रेटण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्यामुळे या गावांनी योजनेस विरोध केला असल्याची माहिती कृती समितीच्या नेत्यांनी दिली.

Ichalkaranji Municipal Corporation
Kolhapur Rain : पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, एका दिवसाच्या पावसाने ५३ बंधारे पाण्याखाली

दरम्यान कसबा सांगावच्या सरपंच विरश्री जाधव यांच्यासोबत चर्चा केल्यास त्यांनी या योजनेला तीव्र विरोध केला. त्या म्हणाल्या की, मागच्या २ महिन्यांपूर्वी नदी पात्रातून उपसाबंदी करण्यात आली होती. यावेळी आम्ही कागल पाटबंधारे विभागासोबत चर्चा करून ही योजना होऊ नये असे पत्र दिले होते.

यावर पाटबंधारे विभागाने ही स्कीम होणार नसल्याची माहिती दिली होती. परंतु कागल पाटबंधारे विभागाकडून आकडेवारीचे पत्र आले आहे. यामुळे पाटबंधारे विभागाकडून वेगवेगळी माहिती देवून दिशाभूल सुरू असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

Ichalkaranji Municipal Corporation
Kolhapur Landslide : तर कोल्हापूर जिल्ह्यातही इर्शाळवाडीसारखी स्थिती होऊ शकते, तब्बल ७६ गावांना भुस्खलनाचा धोका

कृती समितीने केले हे ठराव

योजना रद्द न केल्यास कर्नाटकात जाण्याचा ठराव करणेबाबत, तसेच जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचा निषेध, प्रत्येक गावात जनजागृती करणे, इचलकरंजीचे माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांचा निषेध, सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेणे, गैबी बोगदा बंद करणे यासह योजनेला विरोधासाठी पाठिंबा न देणाऱ्या राजकीय नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

प्रशासनाविरोधात संघर्षासाठी नदीकाठ सज्ज असल्याचा इशाराही दिला. यावेळी राजेंद्र माने, अमोल शिवई, चंद्रकांत पाटील, सचिन भोसले, विक्रमसिंह माने, बाबासाहेब मगदूम, बाबाय्या स्वामी, युवराज पाटील, कलगोंडा पार्वते, अवनिश मगदूम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com