Sandipan Bhumre : ‘रोहयो’ची कामे डिसेंबरअखेर सुरू करा

पालकमंत्री भुमरे; आठही जिल्ह्यांतील योजनेचे उपजिल्हाधिकारी उपस्थित
Sandipan Bhumre
Sandipan BhumreAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : रोजगार हमी योजनेतील मंजूर कामे डिसेंबर अखेर सुरू करून विभागाने दिलेला लक्ष्यांक प्रत्येक जिल्ह्यांनी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी (ता. ५) विभागीय आढावा बैठकीत दिले. आठही जिल्ह्यांतील रोहयोचे उपजिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हा‍धिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत रोजगार हमी योजना विभागाचे सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपायुक्त रोहयो समीक्षा चंद्राकार, गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

Sandipan Bhumre
‘रोहयो’तून विहिरी, शेतरस्त्यांची कामे सुरू करा ः निंबाळकर

मातोश्री पाणंद रस्त्याची कामे पूर्ण करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा. विशेषत: जालना जिल्ह्यातील अबंड व घनसावंगी या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी शेतरस्त्यासाठी वारंवार मागणी केलेली असून, ही मागणी पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी कालबद्ध कार्यक्रम आखून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा, डिसेंबरनंतर कारवाई करण्याचे निर्देश रोहयोमंत्री यांनी दिले.

या बैठकीत औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांनी शासनाने दिलेला रोहयोच्या योजनेतील कुशल व अकुशल कामांचा निधी खर्च करून तत्काळ उर्वरित कामे पूर्ण करावेत. यामध्ये सामूहिक, वैयक्तिक विहीर, शोष खड्डे, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, घरकूल बांधणी या कामाचा संबंधित अधिकाऱ्याकडून जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा घेतला.

सचिव नंदकुमार यांनी शेतकऱ्यांना व गरीब दुर्बलांना यातून बाहेर काढण्यासाठी व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी रोजगार हमी योजना राज्यात राबविले जात असून, यामध्ये उपजिविकेसोबत शिक्षण, आरोग्य, राहणीमान व आर्थिक प्रगती यासाठी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेने प्रमाणिकपणे पार करावी. ‘रोहयो’च्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर डिसेंबरनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे नंदकुमार यांनी सांगितले.

Sandipan Bhumre
रत्नागिरीत नव्या १९ पाणी योजनांची कामे सुरू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com