Kharif Sowing : साडेपाच लाख हेक्टरवरील पेरा पावसाच्या प्रतीक्षेत

Nashik Rain : यंदा मॉन्सूनने हुलकावणी दिली. तो वेळेवर बरसला नाही. मात्र अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या भरवशावर जुलैअखेर कशाबशा पेरण्या झाल्या आहेत. आता ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
Kharif Season : नाशिक : यंदा मॉन्सूनने हुलकावणी दिली. तो वेळेवर बरसला नाही. मात्र अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या भरवशावर जुलैअखेर कशाबशा पेरण्या झाल्या आहेत. आता ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अशातच पावसाने खंड दिल्याने पिके माना टाकू लागली आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरीतील थोड्याफार पाण्यावर पिके तग धरून होती. मात्र विहिरींनीही तळ गाठल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. साडेपाच लाख हेक्टरवरील पेरा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्यात चालू वर्षीच्या खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ४१ हजार ७७१ हेक्टर होते. त्यापैकी ११ ऑगस्टअखेर ५ लाख ६६ हजार ९७३ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षी ऑगस्टअखेर ६ लाख ९ हजार ८९८ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ५ टक्के पेरण्या कमी आहेत. चालुवर्षी ८८.३५ टक्के हे प्रमाण आहे. मागीलवर्षी ते ९२.९६ टक्के होते.

Kharif Sowing
Kharif Sowing : राज्यात खरिपाचा ९६ टक्के पेरा; मूग, उडदाचा पेरा अर्धवट

गेल्या काही वर्षांत चारा उपलब्धता व कमी पाण्यावर येणारे पीक, मिळणारा भाव यामुळे मका पिकावर शेतकरी स्थिर असून त्यात वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षात सोयाबीनच्या दरात काहीसा दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनचाही पेरा सरासरीपेक्षा अधिक केला. मात्र लष्करी अळीचा प्रादुर्भाव व सोयाबीन पिवळे पडण्याचे प्रमाण अधिक आहे. यंदा पावसाने सर्व गणिते बिघडवल्यामुळे हंगाम असून नसल्यासारखीच परिस्थिती आहे.
पश्चिम पट्ट्यात त्रंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा तालुक्यांत पावसाने दिलासा दिला. मात्र जिल्ह्याच्या पूर्व भागातील चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नरमधील परिस्थिती गंभीर आहे. सटाणा, कळवण, दिंडोरीतील कुठे दिलासा तर कुठे पावसाने दडी मारली.

पेरणीची ठळक स्थिती :
  अन्नधान्य पिकात भात लागवडी अद्याप सरासरीपेक्षा कमीच, बाजाराचा पेरा यंदा निम्म्यावर तर मक्याचा सरासरीपेक्षा अधिक पेरा
  कडधान्य पिकात जिल्ह्यात मुगाचा सरासरीपेक्षा अधिक पेरा; तूर निम्म्यावर तर उडीद निम्म्याहून कमी
  गळीत धान्य पिकात सरासरीपेक्षा सोयाबीन पेरा यंदा विक्रमी, भुईमूग निम्म्याहून अधिक, कारळे निम्म्याहून कमी, थोड्याफार प्रमाणात सूर्यफूल तर तीळ शून्यावर
  यंदा पावसामुळे पूर्व भागातील कापूस लागवडीत घट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com