Summer Sowing : पुणे विभागात उन्हाळी पिकांच्या पेरण्यांची लगबग सुरू

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Summer Crop Sowing पुणे ः गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या (Summer Sowing) सुरू झाल्या आहेत. यंदा पाण्याची (Irrigation) उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने पेरणीच्या क्षेत्रात (Sowing Acreage) काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे विभागात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या २७ हजार ६२५ हेक्टरपैकी ३ हजार ११३ हेक्टर म्हणजेच ११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांच्या समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात चारा टंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरण्याकडे वळू लागले आहे. परिणामी, विभागात उन्हाळी पिकाच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता तरी काही भागांत पाणीपातळीत चांगलीच घट झाली होती. त्यामुळे पाणीटंचाई सुरू झाली नसली, तरी आगामी काळात पाणीटंचाई काही प्रमाणात भासण्याची शक्यता आहे.

त्याचा फटका उन्हाळी पेरण्यांना बसू शकतो अंदाज आहे. उन्हाळी मक्याची २३९६, बाजरी १२, उन्हाळी मूग ५, उडीद १, भुईमूग ६५३, उन्हाळी सूर्यफूल २, सोयाबीन ३८, तीळ १ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Bajari Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी पूर्ण

सध्या विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पीक काढणीस आले आहे. ज्वारी पिके काढणीस आली आहेत.

जिल्ह्यामध्ये हंगामातील उन्हाळी पिकांच्या पेरणीस सुरुवात झालेली नाही. पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील गहू पिकांच्या काढणीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी बाजरी व भुईमूग पिकांची पेरणीस सुरुवात झाली आहे.

काही ठिकाणी बाजरी, भुईमूग पिके उगवून वर आली आहेत. जिल्ह्यात दौंड, बारामती या तालुक्यात पेरणी झाली आहे. सोलापूरमध्ये रब्बी हंगामातील पिकांची गहू पिके पक्वतेच्या अवस्थेत आहे. ज्वारी पिके दाणे भरण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत असून, पीक परिस्थिती चांगली आहे.

हरभरा पीक दाणे भरणे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका व भुईमूग पिके उगवून आली आहे. जिल्ह्यात मोहोळ, करमाळा, सांगोला या तालुक्यांत काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.

जिल्हानिहाय झालेली पेरण्या ः (हेक्टरमध्ये)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्के

नगर --- ८८८६ --- ० --- ०

पुणे --- ११,०९४ --- ६१५ --- ६

सोलापूर --- ७६४५ --- २४९७ -- ३३

एकूण --- २७,६२५ --- ३११३--- ११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com