Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीचा १ लाख ८३ हजार हेक्टरवर पेरा

रब्बी हंगामात बियाणे, खतांची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाने पुरेसे खते आणि बियाणे उपलब्ध केली होती. त्यामुळे खतांची, बियाण्यांची टंचाई भासली नाही.
Rabbi Season
Rabbi SeasonAgrowon

सांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांची पेरा (Rabi Sowing) १ लाख ८३ हजार ३८१ हेक्टरवर झाली आहे. रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाच्या हंगामात मका पिकाची (Maize Cultivation) १९ हजार ६७२ हेक्टरवर म्हणजे १०८ टक्के पेरा झाला असल्याची माहिती कृषी विभागाने (Agriculture Department) दिली.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १९० हजार ९६१ हेक्टर इतके आहे. त्यापैकी १ लाख ८३ हजार ३८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

ज्वारीचे सरासरी १ लाख २६ हजार ०६६ हेक्टर क्षेत्र असून, १ लाख २२ हजार १८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची सर्वाधिक पेरणी जत तालुक्यात झाली आहे.

रब्बी हंगामात बियाणे, खतांची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाने पुरेसे खते आणि बियाणे उपलब्ध केली होती. त्यामुळे खतांची, बियाण्यांची टंचाई भासली नाही.

जिल्ह्यातील जत तालुक्यात आगाप रब्बी हंगामातील ज्वारी पेरणी केली जाते. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यापासून जत तालुक्यात ज्वारीचा पेरा शेतकऱ्यांनी केला.

यंदाच्या हंगामात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीस अडथळा निर्माण झाला होता.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या नियोजनात बदल केल्याने पेरणी उशिरा सुरू झाली. त्यानंतर पिकास पोषक असे वातावरण असल्याने पिकांची अपेक्षित वाढ झाली.

सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मका, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. पिकांवर रोगाचाही प्रादुर्भाव दिसून येत नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. जिल्ह्यात गव्हाची १८ हजार ०७४ हेक्टर, मका १९ हजार ६७२ हेक्टर, तर सूर्यफुलाची १०० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Rabbi Season
Rabbi Jowar Area : रब्बी ज्वारीचे क्षेत्र यंदा ८० हजार हेक्टरने घटले

तालुकानिहाय पेरणीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका - क्षेत्र

मिरज - २३ हजार ९४४

जत - ७६ हजार ५७५

खानापूर - ६ हजार २८०

वाळवा - ११ हजार ३७२

तासगाव - ९३ हजार ४८

शिराळा - ४ हजार ४८२

आटपाडी - १८ हजार ८६०

कवठेमहांकाळ - १३ हजार ५९६

पलूस - ४ हजार ३७१

कडेगाव - ८ हजार ३७४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com