Kharif Sowing : अमरावतीत पेरणी ९६ टक्के; कर्जवाटप ८८ टक्के

Crop Loan : खरीप हंगामात सरासरी ९६ टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. मात्र बँकांकडून पीककर्ज वाटप सुरूच असून, उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon

Amravati News : खरीप हंगामात सरासरी ९६ टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. मात्र बँकांकडून पीककर्ज वाटप सुरूच असून, उद्दिष्टापैकी ८८ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. १ लाख ८ हजार २५० शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.

Kharif Sowing
Crop Damage Compensation : अतीवृष्टीच्या मदतीबाबत संभ्रम दूर न केल्यास अंदोलन

यंदा खरिपासाठी १४५० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हा सहकारी बँकेचा यामध्ये ५६५ कोटींचा हिस्सा आहे. तर राष्ट्रीय बँका ७९३.७५ कोटी व खासगी बँकांसाठी ७३.७५ कोटींचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले.

Kharif Sowing
Crop Damage Compensation : कंधार-लोह्याला न्याय मिळाला नाही तर कोर्टात जाऊ

१ एप्रिलपासून कर्जवितरणास प्रारंभ करण्यात आला. एकूण १ लाख ८२ हजार ३०० सभासद पात्र होते. त्यातुलनेत १ लाख ८ हजार २५० शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. १२७१ कोटी ३२ लाख रुपये कर्जवितरण आतापर्यंत झाले आहे. राष्ट्रीय बँकांनी लक्ष्यांकाच्या तुलनेत ८३ टक्के, बँकांनी ४४, ग्रामीण बँकेने १११ व जिल्हा सहकारी बँकेने १०० टक्के वितरण केले आहे.

कर्जवितरणाची स्थिती (कोटी रुपये)

बँक लक्ष्यांक कर्जवाटप टक्केवारी सभासद

राष्ट्रीय बँक ७९३.७५ ६५६.३३ ८३ ५२,२७१

खासगी बँक ७३.७५ ३२.५८ ४४ १९११

ग्रामीण बँक १७.५० १९.३४ १११ १४५७

जिल्हा सहकारी ५६५ ५६३.०७ ९९.६५ ५२,६११

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com