Fig Farming : दक्षिण आशिया, आखाती देशांना पुरंदरच्या अंजिराची गोडी

पुरंदरच्या अंजिराला २०१६ मध्ये भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाल्यानंतर गतवर्षी शेतकऱ्यांनी मिळूनच आपल्या कंपनीद्वारे विशिष्ट पारदर्शक पनेटमध्ये पॅकेजिंग केले व ‘सुपर फिग’ नावाने ब्रँडिंग केले.
Fig
FigAgrowon

सासवड : पुरंदरच्या अंजिराला (Purandar Fig) २०१६ मध्ये भौगोलिक निर्देशांक (जीआय) (GI Tag) मिळाल्यानंतर गतवर्षी शेतकऱ्यांनी मिळूनच आपल्या कंपनीद्वारे विशिष्ट पारदर्शक पनेटमध्ये पॅकेजिंग केले व ‘सुपर फिग’ नावाने ब्रँडिंग केले. राज्य अंजीर उत्पादक (Fig Producer) संघाच्या पुढाकाराने ‘पुरंदर हायलँडस फार्मर्स ग्रुप कंपनी’ स्थापली असून या ब्रँडिंगच्या पॅकेजिंगची विक्री पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सुरू झाली.

एकुणच टोपली, पाटीत विक्रीला जाणारा अंजीर आता ‘पनेट’मध्ये मूल्यवाढ घेण्याकडे पाऊल टाकत आहे. त्यातून आता जर्मनी देशापाठोपाठ दक्षिण आशिया व आखाती अशा पाच देशांतून ब्रँडिंगच्या पॅकेजिंगच्या अंजिराला मागणी आली आहे.

Fig
Fig : पुरंदरच्या अंजिराचं मूळ अफगाणिस्तानात

गतवर्षी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या गोविंदबागेत शेतकऱ्यांच्या ‘पुरंदर हायलँडस फार्मर्स ग्रुप कंपनी’चे अध्यक्ष रोहन सतीश उरसळ, उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, गणेश जाधव, माऊली मेमाणे, नितीन इंगळे, बापू शेलार, दीपक जगताप, ज्ञानेश्वर फडतरे आदींनी एकत्रित भेट घेतली व तिथे ब्रँडिंगसह पॅकिंग केलेली पनेट, ट्रेसह तयार बॉक्सचे सादरीकरण केले होते. त्याचे लाँचिंग करताना पवार यांनी विशिष्ट पॅकेजिंग ‘सुपर फिग’ नावाने केलेल्या ब्रँडिंगचे कौतुकही केले होते.

Fig
Fig Crop Disease : अंजिरातील एकात्मिक रोगनियंत्रण

बाजारपेठ वाढण्याची सुचिन्हे...

पनेटमधील पॅकिंगमधून अंजिराचा टिकाऊपणा व मूल्यही वाढले. भविष्यात जीआयमुळे पुरंदर अंजिराला या नव्या ब्रँडिंग व पॅकेजिंगमधून १६० हून अधिक देशांची जागतिक बाजारपेठ अफाट वेगाने वाढण्याची सुचिन्हे दिसत आहेत. पुढे अंजीर प्रक्रीयेत नितीन इंगळे व सहकारी जबाबदारी घेत आहेत. याकामी कृषीच्या गुण नियंत्रणचे संचालक दिलीप झेंडे, मुख्य गुणवत्ता अधिकारी सुनील बोरकर, पणनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार हे उत्पादक संघाला बळ देत आहेत, असे राज्य अंजीर संघाचे अप्पासाहेब काळभोर, रामचंद्र खेडेकर यांनी सांगितले.

Fig
Fig Season : परतीच्‍या पावसामुळे अंजिराचा हंगाम लांबणीवर

पॅकिंगचे असे आहेत फायदे...

अंजिराची साल पातळ असल्याने हाताळणीत होणारे मोठे नुकसान टळते

पुठ्ठा बॉक्सशी संपर्क आल्याने फळाला होणारी बुरशी आता टळते

पनेटममुळे हात न लागता अंजीर सुरक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचतोय

अंजीर फुटणे, मार लागून पाणी सुटण्याचे प्रकार बंद

काढणीपश्चात तंत्राने टिकाऊपणा दीड-दोन दिवसांनी वाढतोय

फळाचे बाजारमूल्य वाढून उत्पादकांचा फायदा

पॅकिंग कसे आहे

एका पारदर्शक पनेटमध्ये चार, सहा किंवा आठ अंजीर, २०० ते ४०० ग्रॅम फळे

पुठ्ठ्याच्या एक ट्रेमध्ये मोठे ५ व लहान ८ पनेट

आउटर बॉक्समध्ये ७ ट्रे

कॉपर, विटॅमिन ए, के, हाय फाबरचे महान स्रोत असल्याचेही पनेटवर लक्षवेधी स्टिकर

एका आउटर बॉक्समध्ये १२ ते १४ कि.ग्रॅ. अंजीर

प्रत्येक पनेट, ट्रे व बाक्सवर साइजनुसार स्टिकर्स

पुरंदरचे सुपुत्र स्व. डॉ. विकास खैरे, संघाचे तत्कालीन अध्यक्ष रवींद्र नवलाखा, आताचे अध्यक्ष अप्पासाहेब काळभोर, सल्लागार गणेश हिंगमिरे आदींनी ही कामगिरी बजावली. ग्रेडिंग, पॅकिंग व जीआय लोगो तयार करून अंजिरास क्वालिटी टॅगमुळे ब्रँडचे संरक्षण झाले. आज पुणे, मुंबई (वाशी) मार्केटसह देशात दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, सिलिगुडी, कोची, अहमदाबाद, बेंगलोर हे नवे पॅकिंग ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहे.

- रोहन उरसळ, अध्यक्ष,

पुरंदर हायलँडस फार्मर्स ग्रुप कंपनी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com