Odisha ATM :ओडिशात धान्य वाटपासाठी एटीएमसारखे मशीन

गावखेड्यांतही एटीएमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याला गंमतीने ऑल टाईम मशीन (ATM) असंही म्हणलं जातं. एटीएममधून जसे पैसे काढता येतात, तसं जीवनावश्यक धान्यासाठी अशा मशीन्स उपलब्ध झाल्या तर?
All Time Grain
All Time GrainAgrowon
Published on
Updated on

पैसे काढण्यासाठी एटीएम (ATM) मशीन ही काही आता नवलाईची गोष्ट राहिली नाही. अगदी गावखेड्यांतही एटीएमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याला गंमतीने ऑल टाईम मशीन (ATM) असंही म्हणलं जातं. एटीएममधून जसे पैसे काढता येतात, तसं जीवनावश्यक धान्यासाठी अशा मशीन्स उपलब्ध झाल्या तर? ओडिशा सरकारने तसा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे.

ओडिशामध्ये धान्याचं वाटप करणाऱ्या या मशिन्सचं बारसं ऑल टाइम ग्रेन (ATG) असं करण्यात आलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) आणि राज्य अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना या मशिन्सच्या माध्यमातून धान्याचं वाटप केलं जाणार आहे. राज्याचे अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्री अतनू नायक यांनी नुकतीच ही माहिती दिली.

वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार एटीएम (ATM) मशिन्ससारख्याच या मशीन असणार आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील शहरी भागात या मशिन्स सुरु करण्यात येणार आहेत.
सुरुवातीला राजधानी भुवनेश्वरमध्ये या एटीजी मशिन्स बसवण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणी एटीजी किऑस्क उपलब्ध करून दिले जातील.

All Time Grain
Rice Procurement : तेलंगणातील तांदूळ खरेदीस एफसीआयचा होकार

ओडिशा सरकारकडून लाभार्थ्यांना विशेष कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डचा वापर करून लाभार्थ्यांना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायदा (NFSA) आणि राज्य सरकारच्या खाद्य सुरक्षा योजनेतील मोफत धान्य मिळवता येईल. शहरी भागातील प्रयोग यशस्वी झाल्यावर या एटीजी मशिन्स राज्यभर लावण्याचा सरकारचा विचार आहे.

अल्प दरात कृषी कर्ज
ओडिशा सरकारने छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना १ लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कृषी कर्ज (Agricultural Loan) देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जात होते. त्यात आता ५० हजारांची वाढ करण्यात आली. याशिवाय छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना १ लाख ते ३ लाख रुपयापर्यंतचे कर्ज २ टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला. राज्यातील ३२ लाख छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com