Water Conservation : पूर्व विदर्भातील प्राचीन तलाव संकटात

सहाशे वर्षांपूर्वी पूर्व विदर्भात जलसंवर्धन आणि जलसिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचे मॉडेल असलेल्या बोळी (लहान तलाव) प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे संकटात सापडल्या आहेत.
Water Conservation
Water ConservationAgrowon

Water Conservation सहाशे वर्षांपूर्वी पूर्व विदर्भात जलसंवर्धन आणि जलसिंचनासाठी (Irrigatiion) अत्यंत महत्त्वाचे मॉडेल असलेल्या बोळी (लहान तलाव) प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे संकटात सापडल्या आहेत. येत्या काळात त्या वाचविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नाही तर त्या इतिहासजमा होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

पर्यावरणाचे सर्व संतुलन राखत पाणी वाचविण्यासोबत खरीप भातशेतीसाठी वरदान ठरलेल्या या बोळी वाचविण्यासाठी सरकारने तत्काळ मोहीम राबविण्याची गरज आहे. त्या जलसंग्रहाचे मोठे स्रोत आहेत. मात्र अलीकडे या बोळी बुजविल्या जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे, असे पुरातत्त्व संशोधक डॉ. रघुनाथ बोरकर यांनी सांगितले.

Water Conservation
Water Conservation : ‘जलसंधारणा’त मजूर संस्था होणार मालामाल

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाढोणा या गावात कुंभार बोळी, चांभार बोळी, महार बोळी, गोंडाची बोळी, जानबा तेल्याची बोळी, आसाई बोळी, येरन बोळी, जांभार बोळी, माराईची बोळी, रामाजीची बोळी, निंबाची बोळी, देवार बोळी, उमदाई बोळी होत्या.अशीच नावे पूर्व विदर्भातील अनेक गावांमध्ये असलेल्या बोळीची आहेत. प्रत्येक बोळीचे वेगळे वैशिष्ठ्ये आहे. त्यापैकी काहींचेच अस्तित्व उरले आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२१ मध्ये जिल्ह्यातील सर्व प्राचीन बोळ्या जतन करून त्या संरक्षित व्हाव्यात यासाठी आदेश जारी केले होते, परंतु त्याची नीट अंमलबजावणी होऊ शकली नाही.

Water Conservation
Water Conservation : संस्कृती संवर्धनला उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार

बोळ्यांचे प्राचीन महत्त्व...

- गोंड राजा किसनसिंह (इ.स. १६८४- १६९६) यांच्या कार्यकाळात शेती विकास आणि जलसिंचनासाठी प्रमुख साधन म्हणून बोळ्यांची निर्मिती

- पूर्वजांचा नैसर्गिक जल स्रोतांचा अमूल्य ठेवा

- गावगाड्यातील प्रत्येक घटकांच्या नावे असलेल्या बोळ्यामुळे समान न्यायाचे तत्त्व अधोरेखित

- भूजल पातळी वाढून उन्हाळ्यातही पाणीसाठा उपलब्ध

- पाणीटंचाईवर बोळ्या सक्षम पर्याय

- विविध जातींच्या व्यवसायांसाठी निर्मिती

- सिंचनासाठी सर्वांत मोठी भूमिका

- पशू, पक्षी, प्राण्यांसाठी पाण्याचे मोठे साधन

...अशा होताहेत बोळ्या नष्ट

- बोळ्या या काही शासकीय, तर काही खासगी मालगुजरांच्या मालकीच्या जागांवर असल्याने त्या बुजवून त्या ठिकाणी इमारती, बांधकाम

- नागभीड तालुक्यात ३५६ बोळ्या होत्या, त्यातील अनेक नष्ट. आता मोजक्याच उरल्या

बोळ्या वाचविण्यासाठी पर्याय

- बोळ्यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करून संरक्षण करणे.

- पूर्व विदर्भात असलेल्या प्रत्येक बोळीचे सीमांकन करणे.

- बोळींच्या आजूबाजूला त्यांची ओळख सांगणारे वन, पर्यावरण विभागाचे बोर्ड लावणे.

- प्रत्येक बोळीचा प्राचीन इतिहास त्याची माहिती कृषी, वन, महसूल विभागाच्या नोंदीत करावी.

- नव्याने विकास करावा

पूर्व विदर्भातील बोळी (बोडी) हा आमचा प्राचीन ठेवा आहे. त्याचे जतन झाले पाहिजे. यापुढे कोणत्याही प्रकारे या बोळी बुजवू दिल्या जाणार नाहीत. त्यासाठी कृषी विभागालाही सूचना दिल्या जातील.

- सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार ६०० हून अधिक बोळ्या होत्या. आता त्यापैकी १ हजार २०० दरम्यान शिल्लक आहेत. जिथे बोळ्या बुजविल्या त्या ठिकाणी आता केवळ पावसाच्या भरवशावर पिके घेतली जात आहेत. बोळ्यांचे जतन करून त्या संरक्षित झाल्या तर भूजल पातळी वाढेल.

- संजय वैद्य, जलतज्ज्ञ, चंद्रपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com