Sharad Pawar : मी साहेबांसोबत होतो, आहे आणि राहील ; श्रीनिवास पाटलांची प्रतिक्रिया

Shrinivas Patil On Sharad Pawar : कऱ्हाडच्या प्रितीसंगमावर आमचे गुरू विसावले असून त्यांच्या दर्शनासाठी माझे मित्र आले आहेत. ते ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, अशी स्पष्ट भूमिका पाटील यांनी मांडली आहे.
Sharad Pawar Shrinivas Patil
Sharad Pawar Shrinivas PatilAgrowon
Published on
Updated on

Sharad Pawar Reaction On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील नऊ आमदारांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

या शपथविधीला राष्ट्रावादीच्या दोन खासदारांनीही हजेरी लावली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे मित्र आणि अत्यंत विश्वासू खासदार श्रीनिवास पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मी साहेबांचा होतो, आहे आणि राहील

राष्ट्रवादीतील झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा अजित पवारांना आशिर्वाद आहे की शरद पवारांसोबत आहात. यावर पाटील यांनी निसंदिग्धपणे मी साहेबांचा होतो, आहे आणि राहिल असे उत्तर दिले.

Sharad Pawar Shrinivas Patil
Sharad Pawar : राष्ट्रवादीचा भविष्य काळासाठी आश्वासक चेहरा कोण? मिश्किल हसत उत्तर आलं ‘शरद पवार...'

कऱ्हाडच्या प्रितीसंगमावर आमचे गुरू विसावले असून त्यांच्या दर्शनासाठी माझे मित्र आले आहेत. ते ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, अशी स्पष्ट भूमिका पाटील यांनी मांडली आहे.

समाजकारण, राजकारण या पलिकडे ज्यांनी आयुष्यभर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची साथ दिली. गोरगरिबांची साथ दिली, पुरोगामी धोरण स्विकारले त्या माझ्या मित्रासोबत मी कायम राहणार असल्याचेही पाटील म्हणाले.

Sharad Pawar Shrinivas Patil
Sharad Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा 'पुन:श्च हरी ओम!', कऱ्हाडातील प्रितीसंगमावर दाखल

पावसातील सभेतही दिली खंबीर साथ

शरद पवार आणि श्रनिवास पाटील यांची मैत्री सर्वश्रृत आहे. महविद्यालयीन जीवनापासून या दोघांची घट्ट मैत्री आहे. वयाच्या ऐंशीतही पाटील शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत.

२०१९ विधानसभेच्या निवडणुकांवेळी शरद पवार यांची पावसात झालेली सभा प्रचंड गाजली होती. या सभेमुळे संपूर्ण निवडणुक फिरली होती. या सभेतही शरद पवार पावसात सभेत बोलत असताना श्रनिवास पाटील पवार यांच्यामागे खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याचे दिसले होते.

दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळेस पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे. धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील आणि आदिती तटकरे यांनीही शपथ घेतली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे सिध्द झाले आहे. मात्र, अजित पवार यांना पक्षातील किती आमदारांचा पाठिंबा आहे हे अद्याप समोर आलेले नसले तरी सर्व राष्ट्रवादी पक्ष आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com