Urea Shortage in Deola: देवळा तालुक्यात युरियाची टंचाई

तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, अंतर मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. कांदा पिकाला आता खतांची आवश्यकता असल्याने खतांची मागणी वाढली आहे.
Urea Shortage in Deola Taluka
Urea Shortage in Deola TalukaAgrowon

देवळा : तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड (Onion Cultivation) अंतिम टप्प्यात असून, अंतर मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. कांदा पिकाला आता खतांची आवश्यकता असल्याने खतांची मागणी वाढली आहे.

परंतु ऐन हंगामात रासायनिक खतांची टंचाई (Fertilizers Shortage) निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

Urea Shortage in Deola Taluka
Urea Shortage : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत युरियाची जादा दराने विक्री

कांदा  लागवडीनंतर १५ ते २० दिवसानंतर युरिया १०:२६:२६, १५:१५:१५ यांच्यासह इतरही डीएपी या रासायनिक खतांचा डोस द्यावा लागतो.

मात्र ऐन हंगामातच दरवर्षी युरियासह रासायनिक खताची टंचाई निर्माण होत असते. सद्यःस्थितीत रासायनिक खतांसाठी शेतकरी बांधव रासायनिक खताच्या दुकानात चकरा मारताना दिसत आहेत.

युरियाची मोठी मागणी असूनही तो मिळत नसल्याने याबाबत संबंधित विभागाने दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Urea Shortage in Deola Taluka
Urea Shortage : शेतकऱ्यांना युरिया मिळेना

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी कृषी विभागाकडे सदर बाब निदर्शनास आणून दिली असता जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी तातडीने कृषी अधिकारी रमेश शिंदे व अभिजित जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकांची नेमणूक केली.

पथकाने लोहोणेर गावातील कृषी विक्री केंद्रावर जाऊन युरिया व इतर रासायनिक खतांची मागणी केली असता युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांनी आपली ओळख सांगितल्यानंतर व कार्यवाहीचा बडगा दाखवत शिल्लक साठा तपासला असता त्यात खत उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.

तत्काळ या खतांचे वाटप करण्याचे निर्देश संबंधितास अधिकाऱ्यांनी दिले.

कधी कांद्याला भाव नसतो, तर कधी गारपिटीने कांद्याचे पीक उद्ध्वस्त होते. त्यात वेळेवर खतांची उपलब्धता होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

अशा परिस्थितीत शासनाने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, अन्यथा शेतकरी भरडला जाईल.
- कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com