Dr. R. P. Phadke : ज्येष्ठ मधमाशी संशोधक डॉ. फडके काळाच्या पडद्याआड

१९५४ मध्ये महाबळेश्‍वर येथून खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशीपालन प्रशिक्षण पूर्ण केले.
Dr. R. P. Phadke
Dr. R. P. PhadkeAgrowon
Published on
Updated on

Pune News : मधमाशीपालन (Beekeeping) विषयात जीवनभर अखंडपणे व्रतस्थासारखे कार्यरत राहिलेले ज्येष्ठ संशोधक व पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. आर. पी. फडके (Dr. R. P. Phadke) यांचे मंगळवारी (ता. ९) येथे निधन झाले.

आपल्या संशोधन व विस्तार कार्यातून मधमाशीपालन क्षेत्राला दिशा व मार्गदर्शन देण्याबरोबर या विषयाचा विकास करण्यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.

पुणे येथील नूतन मराठी विद्यालय येथे शालेय तर मुंबई येथून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

Dr. R. P. Phadke
Bee Keeping : विजय महाजन यशस्वी मधमाशीपालन उद्योजक कसे बनले?

त्यांनी १९५४ मध्ये महाबळेश्‍वर येथून खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशीपालन प्रशिक्षण पूर्ण केले. पुणे येथून पीएचडी पदवीही घेतली.

एक नोव्हेंबर १९६२ मध्ये केंद्रीय मधमाशी संशोधन संस्थेची (सीबीआरटीआय) संस्थेची स्थापना झाल्यानंतर तांत्रिक निरिक्षक म्हणून त्यांनी संस्थेत अनुभव घेण्यास सुरूवात केली.

१९८१ मध्ये त्यांनी संस्थेच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारला. तर १९८८ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

Dr. R. P. Phadke
Honey Bee Attack : मधमाशांच्या हल्ल्यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

मधमाशीपालन विषयावर त्यांचे ५० शोधनिबंध तर भारतीय मधमाशा आणि मधमाशीपालन हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. २००८ मध्ये बारामती येथील विद्या प्रतिष्ठानतर्फे मधमाशीपालन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी फडके यांना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

. ‘ॲग्रोवन’सोबत त्यांचा सुरवातीपासून जिव्हाळा राहिला. मधमाशीपालन विषयात वेळोवेळी लेखन करण्यासह त्यांनी लिहिलेल्या मालिकेलाही ‘ॲग्रोवन’च्या वाचकांकडून भरघोस प्रतिसाद लाभला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com