
Sindhudurg News ः जिल्ह्यातील नाधवडे (ता. वैभववाडी) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत (Bailgada Sharyat) संगमेश्वर येथील सूरज सुरेश चव्हाण यांच्या बैलगाडीने प्रथम तर कोल्हापूर शाहूवाडी येथील श्रावणी सचिन सावंत यांच्या गाडीने द्वितीय क्रमांक मिळविला.
बंड्या मांजरेकर मित्रमंडळाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी नाधवडे महादेव मंदिरानजीकच्या माळरानावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले.
या वेळी माजी आमदार प्रमोद जठार, सुधीर नकाशे, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, बाप्पी मांजरेकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह अन्य भागांतील तब्बल ५५ बैलगाड्या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये संगमेश्वर कडवई येथील सूरज चव्हाण यांनी १ मिनिट १६ सेकंदांत आपली गाडी पळवली. श्रावणी सावंत यांनी १ मिनिट २२.५३ सेकंद (द्वितीय), कासार्डे येथील संजय जंगम यांनी १ मिनिट २२.७५ सेकंद (तृतीय), करण बेटकर (रत्नागिरी) १ मिनिट २३.४० सेकंद (चतुर्थ), गजानन मधूकर कुंभार (सावर्डे शाहूवाडी) १ मिनिट २४.७५ सेकंद या वेळेत गाडी पळवली.
प्रथम क्रमांकास ३५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास २५ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकास १० हजार रुपये व चषक आणि पाचव्या क्रमांकास ५ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले.
त्याचप्रमाणे उत्कृष्ट चालक म्हणून बबन दोरे यांना २ हजार रुपये, उत्कृष्ट बैल जोडी म्हणून प्रतिक मेस्त्री यांच्या बैलगाडीला २ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.