Bogus Seed Ahmednagar : बोगस बियाणे मुदत संपलेल्या औषधांची विक्री, नगर कृषी विभागाची मोठी कारवाई

Fertilizer and Bogus Seeds : परवाना नसताना गोदामामध्ये खते व बियाणांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खांडगाव येथील कृषी केंद्रावर छापा टाकून गोदाम सील केले.
Bogus Seed Ahmednagar
Bogus Seed Ahmednagaragrowon
Published on: 
Updated on: 

Fertilizer and Bogus Seeds : राज्यात मॉन्सूनचे आमगन झाल्याने पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. राज्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर बोगस बियाणे आणि खतांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. परवाना नसताना गोदामामध्ये खते व बियाणांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खांडगाव येथील कृषी केंद्रावर छापा टाकून गोदाम सील केले.

पाथर्डी तालुका कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत. या तालुक्यातील तिसगाव, मिरी, करंजी, चिचोंडी, शिराळ या भागात पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीसाठी बियाणे आणि खते घेत आहेत. या भागातील काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून बियाणे व खतांचा विनापरवाना साठा केला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

यावरून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाथर्डी तालुक्यातील नाथकृपा व बळीराजा या दोन कृषी सेवा केंद्राची धडक मारली. यामध्ये कृषी केंद्र प्रमुखाकडे खते आणि बियाणे विकण्याचा परवाना नसतानाही साठा असल्याचे दिसून आले. या कृषी सेवा केंद्रांचे गोदाम सील करून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

यंदा पाऊस लांबल्याने महिनाभर उशिरा पेरण्या होत असल्याचे चित्र आहे. यामुळे मागच्या ४ दिवसांपासून पावसाने काहिसा दिलासा दिल्याने शेतकरी पेरणीसाठी करत आहे. याचा फायदा घेऊन या भागातील काही कृषी सेवा केंद्र प्रमुखांनी अनधिकृतपणे खते व बियाणांचा साठा करत मनमानी भावाने विक्री करत होते.

Bogus Seed Ahmednagar
Bogus Fertilizer : ‘केपीआर’च्या खतांचे पाच नमुने फेल

याबाबत कृषी विभागाला माहिती देण्यात आली होती. त्यानंतर भरारी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करून काही कृषी केंद्र चालकांकडे मुदत संपलेली औषधे आढळून आली.

तसेच काही सेवा केंद्रात अनधिकृत पणे खतांची विक्री होत असल्याचे दिसून आले. खरीप व रब्बी हंगामात कृषी केंद्रचालक बियाणे व खतांचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करीत आहेत.

बोगस बियाणे विकणाऱ्या, तसेच, खते व बियाणांचा विना परवाना साठा करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

खांडगाव येथील दोन कृषी सेवा केंद्रांना परवाना नसताना खते व बियाणांचा साठा केल्याचे आढळून आल्याने दोन्ही दुकानांचे गोदाम सील केले आहे. भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व कृषी केंद्रावर कृषी विभागाचा वॉच राहणार आहे, असे पाथर्डीचे तालुका कृषि अधिकारी सुधीर शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com