Mahila Shakti Sanman : ‘महिला शक्ती सन्मान’ योजनेची सोडत जाहीर

Agrowon Lucky Draw Scheme : शैलजा कांबळे, जयश्री राखोंडे ठरल्या ‘ई बाइक’च्या विजेत्या
Agrowon Draw
Agrowon DrawAgrowon

Pune News : दै. ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या ‘महिला शक्ती सन्मान’ योजनेत शैलजा प्रभाकर कांबळे (रा. वाघाळवाडी सोमेश्‍वरनगर, ता. बारामती, जि. पुणे) आणि जयश्री अनिल राखोंडे (चान्नी, ता. पातूर, जि. अकोला) या ‘ई बाइक’ बंपर बक्षिसाच्‍या विजेत्या ठरल्या आहेत.

‘ॲग्रोवन’मधून १० मार्च ते २१ जून दरम्यान सलग १०० दिवस कूपन आधारित स्पर्धेची सोडत सेंद्रिय शेती क्षेत्रातील ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या वसुधा सरदार, ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या सामाजिक विकास तज्ज्ञ डॉ. संगीता शेटे, तरुण महिला शेतकरी आणि यशस्वी कृषी उद्योजिका सुचेता निगडे यांच्या हस्ते गुरुवारी (ता.३) काढण्यात आली.

या स्पर्धे दरम्यान ५५ लाखांपेक्षा अधिक रकमेची तब्बल ३ हजार ३२५ बक्षिसे जाहीर करण्यात आली. या वेळी ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ माध्यम समूहा’चे कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिनाथ चव्हाण यांनी ‘ॲग्रोवन’ची वाटचाल आणि महेंद्र पिसाळ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ‘ॲग्रोवन’चे वितरण उप-सरव्यवस्थापक संभाजी घोरपडे यांनी बक्षीस योजनेची माहिती दिली. मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

Agrowon Draw
Woman ST Bus Concession : महिला सन्मान योजनेचा १७ लाख महिलांनी घेतला लाभ

‘महिलांच्या नावे सातबारा गरजेचा’

डॉ. शेटे म्हणाल्या, ‘‘शेतीमध्ये सर्वाधिक कष्ट महिला करतात. मात्र डोळ्यांसमोर शेतकरी म्हटलं, की केवळ पुरुष शेतकऱ्यांचीच प्रतिमा येते. हे दुर्दैव आहे. सातबारा उताऱ्यावर सहहक्कदार म्हणून अद्यापही महिलांची नावे दिसत नाहीत. महिलांच्या नावे सातबारा करण्यासाठीच्या सामाजिक संवेदना जागृत करण्याची गरज आहे.’’ ‘‘शहरी ग्राहक त्यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. मात्र मुलांच्या सात्त्विक आहाराकडे ग्राहकांचे दुर्लक्ष्य होत आहे.

निसर्गामुळे शेतीचे बिघडलेले चक्र पूर्ववत करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करत, रसायन अवशेषमुक्त शेती करण्याची गरज आहे. यातून शेतकरी-ग्राहक संबंध वाढविण्याची गरज वसुधा सरदार यांनी व्यक्त केली. तर निगडे म्हणाल्या, ‘‘मी लहानपणापासून वडिलांचे शेतीतील कष्ट पाहिले आहे. शेती किफायतशीर करण्यासाठी तंत्रज्ञान वापरातून उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे. हाच विचार करून मी कृषी आणि व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पॉलिहाउस शेती करत आहेत. कृषी पदवीधर मुलींनी प्रत्यक्ष शेती करण्याची गरज आहे.’’

Agrowon Draw
Mahila Shakti Scheme : ‘ॲग्रोवन महिला शक्ती सन्मान योजना’ जाहीर

२१ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या नाण्यांचे विजेते ः

- मीनाक्षी हेमंत चौधरी (रा. अट्रावल, ता. यावल, जि. जळगाव)

- आरती तानाजी पारखी (रा. माण, ता. मुळशी, जि. पुणे)

- मंजूषा मुकुंद म्हेत्रे (रा. कोरेगाव, जि. सातारा)

- रावसाहेब एकनाथ सुपेकर (रा. भाविनिमगाव, ता. शेवगाव, जि. नगर)

- संगीता चंद्रशेखर उकिर्डे (रा. चिखर्डे, ता. बार्शी, जि. सोलापूर)

- गायत्री तुषार उगले (रा. देननंदन मुंगसरा, ता. नाशिक)

- शुभदा सुनील जुईकर (रा. पांडवादेवी, ता.अलिबाग, जि. रायगड)

- पुष्पा सोमनाथ लेनगुरे (रा. सावली, जि. चंद्रपूर)

- कल्पना मधुकर मांगोरे (रा. कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

- मीराबाई शंकरराव साळुंके (रा. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

मोबाइल विजेते

- गोकूळ लहानू दातीर (रा. गणोरे, ता. अकोले, जि. नगर)

- अर्चना रमेशकुमार सोनी (रा. विवेकानंद नगर, जि. हिंगोली)

- सुजाता चंद्रकांत गवारे (रा. माळवाडी, मंचर, जि. पुणे)

- सुनंदा गजानन नावकार (रा. वाडेगाव बाळापूर, जि. अकोला)

- सविता दीपक रुईकर (रा. शिरोळ, ता. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर)

- पुरुषोत्तम रामराव यावले (रा. कारंजा, जि. वर्धा)

- आशाबाई अशोक न्हावी (रा. दहिगाव, ता. यावल, जि. जळगाव)

- ऋग्वेद उमेश निचोरे (रा. अलिबाग, जि. रायगड)

- आश्‍विनी वैजीनाथ हावळे (रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव)

- आश्‍विनी नितीन मेहेत्रे (रा. देऊळगावराजा, जि. बुलडाणा)

- गायत्री शशिकांत सुतार (रा. साबे, ता. सांगोला, जि. सोलापूर)

- छाया चंद्रकांत यादव (रा. अतित, ता. जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com