Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांच्या मागणीवर विखे पाटलांचे उत्तर, पशुधन विम्याबाबत सकारात्मक

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांनी एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरवावा अशी मागणी केली आहे.
sadabhau khot
sadabhau khotagrowon
Published on: 
Updated on: 

Insurance Pet Animal : मागच्या काही दिवसांपूर्वी दूध दराच्या मुद्दावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेत काही मागण्या केल्या होत्या. यानंतर पुन्हा सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. ते म्हणाले की एक रुपयांमध्ये पीक विमा योजना राबवली आहे. त्याच धर्तीवर एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरवावा अशी मागणी खोत यांनी केली आहे.

दरम्यान यावर दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या या मागणीवर राज्य शासन सकारात्मक आहे. तसेच विम्याच्या माध्यमातून सरकार पशुधनाचे दायित्व स्वीकारेल असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.

याचबरोबर लंपी रोगाच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनावरांना लसीचा दुसरा डोसही मोफत देण्यात येणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. तसेच दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस प्रशासन, FDA यांना सोबत घेऊन संयुक्त समिती बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दूध दरावरून सदाभाऊ खोत आक्रमक

रयत क्रांती संघटनेकडून दुधाला दर वाढ मिळावी म्हणून मागणी करण्यात येत होती. यावेळी दूध खरेदी दर हा राज्यात एकसारखाच असावा अशी असे म्हणत विखे पाटील यांनी ३५ रूपये लिटर दूध देण्याची ग्वाही दिली.

यानंतर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपल्याला हा दर मान्य असल्याचे सांगितलं. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दरामुळे तोटा सहन करावा लागत असल्याने रयत क्रांती संघटनेने दूध परिषद घेतली होती.

sadabhau khot
Sadabhau Khot : देशी दारूच्या क्वार्टर एवढी किंमत एक लिटर दुधाला द्या ; सदाभाऊ खोत यांची अजब मागणी

दूध उत्पादनात घट

यंदा उन्हाळा भरपूर असल्याने जनावरांच्या दुधात मोठी घसरण झाली होती. यामुळे यंदा तब्बल १० टक्क्यांनी दुधाचे उत्पादन घटले होते. याचबरोबर मागच्या काही महिन्यात पशुखाद्याचे दर ५० किलो मागे २०० ते २५० रूपयांनी वाढ झाली आहे.

याचबरोबर अन्य पशुखाद्याच्या दरातही वाढ झाली आहे. उन्हाळ्यात यंदा पहिल्यांदाच कमी उत्पादनाबरोबर दरही उतरल्याने दूध उत्पादक शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.