
नगर : जमीन सपाटीकरण (Land Leveling) (सुधारणा) करणे, गौणखनिज (Minor Minerals) उत्खनन व वाहतूक करण्याबाबत आदर्श गाव हिवरेबाजार येथे ग्रामसभेत नवीन नियमावली करण्यात आली आहे. शेतकऱ्याने परवानगीसाठी अर्ज केल्यावर ग्रामपंचायतीने ७ दिवसांच्या आत परवानगी न दिल्यास परवानगी आहे, असे समजून काम सुरू करण्यास काही हरकत नाही, असे समजण्यात येईल, असा ठराव केला आहे.
आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. ग्रामसभेला नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील उपस्थित होते. आदर्श गाव हिवरे बाजार नेहमीच राज्यातील विविध योजनांबाबत आदर्श निर्माण केला आहे. आता जमीन सपाटीकरण (सुधारणा) करणे, गौणखनिज उत्खनन व वाहतूक बाबत नियमावली केली आहे.
शेतकऱ्याची अडवणूक न होता ताबडतोब परवानगी देऊन पुढील काम लवकरात लवकर सुरू व्हावे. सदर नियमावली अमलात आल्यावर ग्रामस्थांना आपापल्या शेतीची सुधारणा (सपाटीकरण) करणे त्यात प्रामुख्याने शेतीसाठी आवश्यक काळी माती व इतर गौणखनिज वाहतुकीचे दृष्टीने सोयिस्कर होईल.त्यानुसार वाहतूक व सपाटीकरण करताना ट्रॅक्टर या वाहनाचा वापर करण्यात यावा. जड वाहतुकीमुळे रस्ते खराब होतात म्हणून डंपरचा वापर करण्यात येणार नाही. सदर कामामुळे यापूर्वी करण्यात आलेल्या जलसंधारण, मृद्संधारण आणि वनसंवर्धन कामास नुकसान होणार नाही. जलसंधारण, मृद्संधारण कामास बाधा येणार याची दक्षता घेण्यात यावी. नवीन घराचे बांधकामासाठी किंवा रस्ते डांबरीकरण करणे कामासाठी सदरची अट शिथिल करण्यात आली. शेतकऱ्याने परवानगीसाठी अर्ज सादर केल्यावर ग्रामपंचायतीने ७ दिवसांच्या आत परवानगी न दिल्यास परवानगी आहे, असे समजून काम सुरू करण्यास काही हरकत नाही असे समजण्यात येईल.
भविष्यकाळातील २५ वर्षांनंतरचे वीजटंचाई लक्षात घेता हिवरे बाजार येथील कृषिपंपासाठी सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येईल. घरपट्टी फेरआकारणी करणे बाबतीत शासन निर्णयानुसार नवीन घरपट्टी आकारणी बाबतीत चर्चा झाली. प्रत्येक कुटुंबाला एटीएम शुद्ध व स्वच्छ पाणी कसे देता येईल यावर चर्चा झाली. वडजूबाई माता व गणेश मंदिर चोपाळा या मंदिराचे अपूर्ण काम मुंबादेवी यात्रा लिलावातील २,९०,००० रकमेतून पूर्ण करण्याचे ठरले. गावातील वैयक्तिक कारणाने वाद झाला, तर त्याला राजकीय वळण लागू नये म्हणून वाद झाल्यास प्रथम पोलिस स्टेशनला नोंदणी करून व तडजोड करून तंटामुक्त समितीमार्फत वाद मिटविण्यात येणार आहे. या ग्रामसभेला सरपंच विमल ठाणगे हरिभाऊ ठणगे, एस. टी. पादिर, रामभाऊ चत्तर, रो. ना. पादिर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.