Crop Insurance : पीकविम्याचे ८६ कोटी रुपये वितरित

परभणी जिल्ह्यातील स्थिती; ३ लाख ४९ हजारांवर शेतकरी लाभार्थी
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

परभणी ः या वर्षीच्या (२०२२) खरीप हंगामात (Kharif Season) पंतप्रधान पीकविमा (Crop Insurance) योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबीअंतर्गत पीक नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केलेल्या परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ३ लाख ४९ हजार १८७ शेतकऱ्यांना मंजूर ८६ कोटी ५४ लाख ७८ हजार ७१८ रुपये एवढी विमा भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविम्याचे १२०० कोटी लवकरच मिळणार

परभणी जिल्ह्यात यंदा खरिपाची ५ लाख १० हजार ७२४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. एकूण ६ लाख ७१ हजार ५७३ विमा प्रस्तावाद्वारे शेतकऱ्यांनी ४ लाख ३८ हजार ८१२ हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. अतिवृष्टी, पूरस्थिती या नैसर्गिक संकटांमुळे विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांनी विमा भरपाईसाठी ४ लाख ९० हजार ४८६ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केलेल्या आहेत. सर्वेक्षणानंतर गणना करून ३ लाख ४९ हजार १८७ शेतकऱ्यांना ८६ कोटी ५४ लाख ७८ हजार ७१८ रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला.

Crop Insurance
Crop Damage Compensation : अतिवृष्टीचे १३० कोटी वितरित

यंदा आजवर १२७ कोटींवर विमा भरपाई...

यंदाच्या ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्याबद्दल मध्य हंगाम प्रतिकूल स्थितीअंतर्गत सोयाबीनच्या उत्पादनात घट आल्याबद्दल सहा तालुक्यांतील आठ मंडळांतील ७३ हजार ८३५ शेतकऱ्यांना ४० कोटी ७२ लाख ७० हजार ९४० रुपये विमा भरपाई मंजूर आहे.

यंदा मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या दोन जोखीम बाबीअंतर्गत मिळून एकूण ४ लाख २३ हजार २२ शेतकऱ्यांना १२७ कोटी २७ हजार ४९ लाख ६५८ रुपये एवढी विमा भरपाई मंजूर झाली आहे. काढणीपश्‍चात नुकसान या बाबी अंतर्गत विमा परतावा मंजुरीनंतर शेतकरी लाभार्थी, तसेच विमा भरपाईत वाढ होऊ शकते, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीकविमा भरपाई (कोटी रुपये)

तालुका शेतकरी संख्या विमा भरपाई रक्कम

परभणी ५५००१ १८.०६४२

जिंतूर ५२६१९ ११.६६९६

सेलू ४१९१६ ८.४१८३

मानवत २३२०६ ७.०१९२

पाथरी ३३६४५ ८.५०८६

सोनपेठ २३८३१ ६.५४९३

गंगाखेड ३२२४४ ७.१८४३

पालम ४१६२७ ७.८८५३

पूर्णा ४५०९८ ११.२४८६

सोयाबीनसाठी मध्यम हंगाम पीकविमा भरपाई (रक्कम कोटीत)

तालुका शेतकरी विमा भरपाई रक्कम

परभणी २९५६२ १७.२२४८

जिंतूर ९१९१ ५.१६४३

मानवत ६०६७ ३.९९७५

सोनपेठ ६६०५ ४.१६३९

गंगाखेड १३६३२ ५.८६१८

पूर्णा ८७७८ ४.३१४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com