River Conservation : नदी अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त चला जाणूया नदीला, या अभियानात ७५ नद्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या अभियानाची व्याप्ती वाढून अनेक नद्यांचा समावेश करण्याचा लोकाग्रह होत आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarAgrowon

Solapur News स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त चला जाणूया नदीला, या अभियानात (River Campaign) ७५ नद्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या अभियानाची व्याप्ती वाढून अनेक नद्यांचा समावेश करण्याचा लोकाग्रह होत आहे.

यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असून, प्रत्येकाने या अभियानात योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले.

Sudhir Mungantiwar
Tapi River : जळगावमधील खेडीभोकरी पुलासाठी मुहूर्त सापडला

महुद बुद्रुक (ता. सांगोला) येथे ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि दीपक साळुंखे, उपजिल्हाधिकारी चारूशीला देशमुख-मोहिते, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, अभिनेते चिन्मय उदगीरकर, जलबिरादरीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नरेंद्र चुग, पर्यावरण अभ्यासक डॉ. अजित गोखले, डॉ. सुमंत पांडे, नदी समन्वयक महेंद्र महाजन, बाळासाहेब ढाळे, सरपंच संजिवनी लुबाळ, वर्षा महाजन यांच्यासह ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, की मानव जन्म सर्वश्रेष्ठ मानला जातो. पण, मनुष्यप्राण्याने पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाला प्रदूषित केले. नदी ही पोषण, रक्षण करणारी, जीवनदायी असूनही तिचे शोषण करण्याचे काम झाले. मात्र जल ही संपदा असून, भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नद्यांचे महत्त्व प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Sudhir Mungantiwar
River pollution : पाताळगंगा नदीला प्रदूषणाचा विळखा

डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, की जलसाक्षरता अभियान आणि जलयुक्त शिवार अभियानातून जलसंवर्धनाचे काम महाराष्ट्रात झाले. हे काम सर्व देशासाठी प्रेरणादायी असून, केंद्राला त्याचे महत्त्व पटवून देऊन सर्व देशभरात अशा प्रकारचे अभियान राबवावे, यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र शासनाशी संवाद साधावा, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

‘कासाळगंगा’चा कृती अहवाल मंत्र्यांना सादर

‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमात जिल्ह्यातील भीमा, माणगंगा, कासाळगंगा, आदिला, धुबधुबी, कोरडा या नद्यांचा समावेश आहे. या उपक्रमात नदी संवाद यात्रा सर्वत्र झाल्या आहेत.

तसेच सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील २३ गावे-वाड्यांची अर्थवाहिनी असलेला कासाळगंगा प्रकल्प प्रदूषणमुक्त अन बारमाही वाहण्यासाठी अभ्यास पूर्ण झाला. कासाळगंगा प्रकल्पाचा लोक अभ्यास आणि कृती अहवालमंत्री मुनगंटीवार यांना या वेळी सादर करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com