Turmeric Market : हिंगोलीतील बाजार समित्यांत हळदीच्या कमाल दरात सुधारणा

Turmeric Rate : हिंगोलीत ७००० ते १०७५० रुपये दर
Turmeric
TurmericAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Turmeric Bazar : हिंगोली ः जिल्ह्यातील हिंगोली व वसमत बाजार (Turmeric Market) समित्यांतील हळदीच्या कमाल दरात सुधारणा झाली आहे.

कमाल दर १० हजार रुपयांवर पोहोचले आहेत. हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये बुधवारी (ता. १२) हळदीची सुमारे ४ हजार क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल १०७५० रुपये तर सरासरी ८८७५ रुपये दर मिळाले.

हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये यंदाच्या एप्रिलमध्ये हळदीची एकूण २३ हजार ३२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५८९८ रुपये दर मिळाले. मेमध्ये ३७१५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल सरासरी ६३३४ रुपये दर मिळाले.


जूनमध्ये कमाल दर ७५०० रुपयांवर गेले. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून हळदीचे दर सुधारण्यास सुरुवात झााली. त्या वेळी आगामी काळातील तेजीचे संकेत दिसत होते. जुलैमध्ये दरात आणखी सुधारणा झाली. जुलैमध्ये दररोज सरासरी दोन ते अडीच हजार क्विंटल हळद आवक होत आहे. मंगळवारी (ता. ११) हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीची २५६५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८९०० ते कमाल १०००० रुपये तर सरासरी ९४५० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ८) हळदीची २४२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७३३० ते कमाल ८८५० रुपये तर सरासरी ८०९० रुपये दर मिळाले.

Turmeric
Turmeric Rate : हळद दरात सुधारणा; नांदेड बाजार समितीत कमाल ९१०० रुपये

वसमतमध्ये कमाल दर ११ हजारांवर
वसमत बाजार समितीत मंगळवारी (ता. ११) हळदीला प्रतिक्विटंल किमान ५८१५ ते कमाल १११११ रुपये तर सरासरी ८४६३ रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. ७) हळदाची ४७५७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७७०० ते कमाल १०५०० रुपये तर सरासरी ९१०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ६) हळदीची ४२७८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५६०० ते कमाल १००१० रुपये तर सरासरी ७८१५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com