Agriculture Department : विकास पाटील यांच्याकडे ‘गुणनियंत्रण’ची सूत्रे

कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक म्हणून विकास पाटील यांनी सूत्रे स्वीकारली आहेत
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी आयुक्तालयाच्या (Commissionerate of Agriculture) निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक म्हणून विकास पाटील (Vikas Patil) यांनी सूत्रे स्वीकारली आहेत.

तसेच, दिलीप झेंडे (Dilip Zende) यांनी विस्तार संचालकपदाचा कार्यभार हाती घेतला आहे. गुणनियंत्रण संचालकपदावरून झेंडे यांची अचानक बदली केल्यामुळे लॉबीला हादरा बसला आहे.

मुंबई पोलिस दलात क्राईम ब्रॅंचला जसे महत्त्व असते, तसाच वरचष्मा गुणनियंत्रण विभागाचा कृषी आयुक्तालयात आहे. हा विभाग आता पाटील यांच्या ताब्यात दिल्यानंतर नेमके काय बदल होतात, याकडे गुणनियंत्रण कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

पाटील यांचे विस्तार आणि गुणनियंत्रण या दोन्ही विभागात अधिकाऱ्यांपासून ते क्षेत्रिय कर्मचाऱ्यांपर्यंत संपर्काचे जाळे आहे. मंत्रालयात अधिकाऱ्यांमध्ये त्यांची जवळीक आहे. कामकाजात जास्तीत जास्त संगणक प्रणालीचा वापर करण्याचा त्यांचा हातखंडा आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

“गुणनियंत्रण विभाग हा कोणत्याही कृषिमंत्री व आयुक्तांना आपल्या मर्जीनुसार काम करण्यासाठी हवा असतो. मात्र, नियमांची पायमल्ली करण्याचे झेंडे यांच्याकडून टाळले जात होते.

तसेच, कायद्याच्या चौकटीत राहून गुणनियंत्रणचा गाडा चालत राहावा, उद्योजकांना त्रास होऊ नये, कृषी विभागाची बदनामी होऊ नये, असे कामकाजाचे सूत्र श्री. झेंडे यांनी ठेवले होते.

त्यामुळेच त्यांना या पदावरून जावे लागले आहे. नवे संचालक कोणत्या पद्धतीने हा विभाग हाताळतात, याविषयी कर्मचाऱ्यांना उत्सुकता आहे,” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Agriculture Department
Agriculture Department : राज्यातील कृषी अधिकाऱ्यांचे वेतनश्रेणीप्रश्‍नी आंदोलन सुरू

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, झेंडे यांना पदावरून हटविण्यासाठी स्वतः कृषिमंत्री, आयुक्त अनुकूल होते. तसेच, काही आमदारांनीही शिफारशी केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला या पदावर विकास पाटील यांची वर्णी लागण्यासाठीदेखील एक लॉबी कार्यरत होती.

त्यामुळेच कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते किंवा प्रक्रिया संचालक सुभाष नागरे यांची नावे गुणनियंत्रण संचालकपदासाठी सूचविण्यात आली नाहीत.

बदल्या करतानादेखील फक्त झेंडे व पाटील यांनाच प्राधान्य देण्यात आले व आपापसांत बदल्या करण्यात आल्या आहेत. वस्तुतः डॉ. मोते व नागरे यांच्याही बदल्या अपेक्षित होत्या. परंतु, झेंडे यांनाच हटवायचे असल्यामुळे मंत्रालयातील लॉबीने इतर बदल्या टाळल्या आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : गणेश पाटील यांना ‘कृषिउद्योग’मधून हटविले

जाधव यांचे सर्वाधिकार सुरक्षित

गुणनियंत्रण विभागात संचालक म्हणून दिलीप झेंडे कार्यरत होते. मात्र, बहुतेक निर्णय मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर व खते विभागाचे प्रमुख किरण जाधव यांच्या संमतीने घेतले जात होते. सध्या बोरकर यांना सहसंचालक म्हणून विस्तार विभागात बढती मिळालेली आहे.

मात्र, तरीही ते गुणनियंत्रणचे कामकाज सोडण्यास तयार नाहीत. बोरकर यांच्या जागेसाठी मोठी बोली लागली आहे. त्यामुळे या पदावर नवा अधिकारी लवकरच येईल. परंतु, जाधव यांची बदली होण्याचे तूर्त कारण नाही.

गुणनियंत्रण विभागातील सूक्ष्म अभ्यास व निविष्ठा उद्योगात त्यांचा असलेला दबदबा बघता त्यांची बदली होण्याची शक्यता नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com