Land Acquisition : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, नंतर नोटिसा द्या

Surat Chennai Highway : सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय संबधितांना संपादनाच्या नोटिसा पाठवू नयेत, अशी मागणी करीत, जिल्ह्यातील आमदारांनी पुन्हा एकदा बाधित शेतकऱ्यांबरोबर बैठक घेण्याचा आग्रह धरला.
Land Acquisition
Land AcquisitionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय संबधितांना संपादनाच्या नोटिसा पाठवू नयेत, अशी मागणी करीत, जिल्ह्यातील आमदारांनी पुन्हा एकदा बाधित शेतकऱ्यांबरोबर बैठक घेण्याचा आग्रह धरला.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. ७) सुरत-चेन्नई महामार्गाबाबत बैठक झाली. आमदार दिलीप बनकर व सरोज आहिरे उपस्थित होत्या. आमदार नरहरी झिरवाळ व ॲड. माणिकराव कोकाटे हे ऑनलाइन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आमदारांचे म्हणणे ऐकून घेऊन, स्थानिक पातळीवरील प्रश्न येथेच सोडविले जातील. केंद्रीय प्रश्नाबाबत केंद्राकडे अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले.

Land Acquisition
Railway Land Acquisition : कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी भूसंपादन सुरू

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नरसह विविध तालुक्यांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी संपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नसताना नोटिसा दिल्या जाऊ नयेत, अशी प्रमुख मागणी सर्वच आमदारांनी मांडली

.जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी जसा मोबदला दिला गेला, त्या न्यायाने सुरत-चेन्नई महामार्गासाठी मोबदला दिला जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. ही बाब प्रशासनाने समजून घ्यावी. मूल्यांकन आणि ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात, अशी आमदारांची मागणी होती.

Land Acquisition
Land Acquisition : भूसंपादनाच्या मोबदल्यात दुजाभाव

आमदार आहिरे यांनी यापूर्वी यासंदर्भात निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्याचा आग्रह धरला. आमदार झिरवाळ यांनी सुरत-चेन्नई महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जागा जाणार आहेत, त्यांच्या भावना लक्षात घेऊन बाधित शेतकऱ्यांबरोबर बैठक घ्यावी. त्यांच्या अडचणी विचारात घ्याव्यात, अशी मागणी केली.

आमदार बनकर यांनी मोबदल्याचा मुद्दा मांडताना फळबागा असूनही हंगामी फळबागा दाखविल्या जात आहेत. शेतकरी जागा देत असताना त्यांच्या जागेचा मोबदला देताना त्यांना अडचणीत आणू नयेत, अशी मागणी केली. नाशिक आणि निफाड तालुक्यांत जमिनीचा मोबदला देण्यात शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे मुद्दे आमदारांनी मांडले. जिल्ह्यातील ज्या भागात कामकाज सुरू झाले, तेथेही काही विषय पुढे आले.

समोर आलेले विषय

 सर्व्हिस रोडचा प्रश्न

 गावोगावी सर्व्हिस रोड वाढवा

 शक्य तेथे भुयारी मार्ग करा

 आधी बैठक घ्या, नंतर नोटिसा द्या

 मूल्यांकनाबाबत तक्रारी सोडवा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com