Vasai News : पालघर जिल्ह्यात नवनवीन येणारे प्रकल्प पाहता बाधित क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून हाती घेतले जात आहेत. वसई-विरार महापालिकेने पर्यावरण समतोल राखण्यासाठी अनेक योजना अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यात १० लाख फळरोपांची लागवड करत शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मितीचा संकल्प आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाला आपसूकच बळ मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीखाली जमीन आहे. याठिकाणी विविध पिकांसह भातशेतीची लागवड केली जाते. परंतु अनेक जमिनी या प्रकल्पबाधित होत आहेत. त्यातच केंद्र व राज्य सरकारचे नवे प्रकल्प जिल्ह्यातून गुजरातच्या दिशेने जात आहेत. भविष्यात येथील निसर्गसंपन्नता चिंतेचा विषय बनू नये, म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
ग्रामीण भागात एकूण १० लाख फळरोपांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न व पर्यावरणाला फायदा होईल. तर वसई विरार महापालिकेने देखील आखलेल्या योजना संजीवनी ठरणार आहेत. विजेची बचत करण्यासाठी एलईडी, ई वाहनांचा प्रसार, पुनर्जीवित विहिरी, सायकल ट्रॅक याचसोबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम देखील प्रभावीपणे सुरू केली आहे.
एकीकडे जलप्रदूषणाचा धोका निर्माण होत असताना महापालिकेने तलाव प्रदूषणमुक्त असावे, म्हणून गणेशोत्सव, नवरात्री उत्सवात मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करत आहे. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्यास प्रशासन यशस्वी ठरत आहे. महापालिकेने पर्यावरण अहवाल देखील तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
एक लाख रोपे लावण्याचा निर्धार
यंदाच्या आर्थिक वर्षात वसई, विरार शहरात हिरवळ तयार करण्याचा आयुक्त पवार यांचा मानस आहे. यासाठी एक लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी मोकळ्या जागा, वनविभागाच्या जागेत लागवड केली जाणार आहे. तसेच सामाजिक संस्था व नागरिकांना रोपे दिली जाणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.