MIDC Reservation : वडगाव, पिंपळगावातील ‘एमआयडीसी’चे आरक्षण उठले

या भागातील शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील एमआयडीसी नाव निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
MIDC
MIDC Agrowon
Published on
Updated on

Ngar MIDC News नगर ः नगर आणि श्रीगोंदे तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या साकळाई योजनेच्या (Saklai Scheme) सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. त्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीसाठी आरक्षित (MIDC Reservation) केलेल्या पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता येथील ४६१ हेक्टर जमिनीवरील आरक्षण (Land Reservation) उठवले आहे.

या भागातील शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील एमआयडीसी नाव निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी दिली. विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी डॉ. विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यावेळी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की नगरच्या एमआयडीसीसाठी जमीन आरक्षित करताना वडगाव गुप्ता आणि पिंपळगाव माळवी येथील गावकऱ्यांना, तसेच शेतकऱ्यांना विचारात घेतले नव्हते. बागायती जमीन आरक्षित करण्यात आली होती. हा तेथील शेतकऱ्यांवर अन्याय होता. उद्योग-धंदे आले पाहिजेत, परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे योग्य नाही.

MIDC
Nagar Festival : नगर महोत्सवाचा दुसरा दिवसही ठरला गर्दीचा

त्यासाठी माजी मंत्री कर्डिले यांच्यासह आमचा हे आरक्षण उठविण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्याला यश मिळाले आहे. वडगावची २४३ व पिंपळगावची २१७, अशा एकूण ४६१ हेक्टरवर एमआयडीसीचे नाव लागले होते. वडगावात आमचे हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था आहे. अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. उद्योगमंत्र्यांसोबत अनेकदा बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावला.

MIDC
Nagar News : विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर होणे गरजेचे ः थोरात

उद्योजक सुप्याला जाईनात

खासदार सुजय विखे यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, निवडून आल्यापासून कामाचा धडाका लावला, परंतु ती कामे लोकांपर्यंत पोहोचवून प्रसिद्धी केली नाही. याचाच फायदा उठवत काही लोकांनी ती आपणच केल्याचा गवगवा केला. हे टाळण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषदा घेण्याचा सल्ला कर्डिले यांनी दिला. त्यामुळेच कामे लोकांपर्यंत नेणार आहे. तसा मी कोणाला घाबरत नाही.

MIDC
Nagar onion Rate : नगरमध्ये कांद्याला १ ते १० रुपये दर

उलट, काही प्रमाणात लोकच आम्हाला घाबरतात.पण तसे घाबरण्याचेही कारण नाही, नगरच्या उद्योजकांची बैठक घेतली. त्यावेळी वेगळेच प्रश्न समोर आले. सुपे एमआयडीसीत जागा शिल्लक आहे, परंतु तेथे जाण्यास उद्योजक तयार नाहीत.

जपानमधील कंपन्यांनीही काढता पाय घेतला आहे, तेथे गुंडांची दहशत आहे, अशी चर्चा असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. ती कोणाची दहशत आहे, याचा तुम्हीच शोध घेतला पाहिजे, असे सांगतानाचा त्यांचा निशाणा कोणावर होता हे स्पष्ट झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com