Organic Farming : जिवाणू स्लरी, दशपर्णी अर्कावर संशोधन होणार

नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिवाणू स्लरी व दशपर्णी अर्क याची उपयुक्तता मोठी आहे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

Organic Farming पुणे ः ‘‘नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने (Organic Farming) शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिवाणू स्लरी (Bacterial Slurry,) व दशपर्णी अर्क याची उपयुक्तता मोठी आहे. मात्र, यामधील नेमके शास्त्रीय घटक कळालेले नाहीत.

त्यामुळे भारतीय कृषी संशोधन परिषदेला (ICAR) या दोन्ही निविष्ठांवर संशोधन करण्यास सूचित केले जाईल,’’ अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिली.

राज्यात २०१८ मध्ये स्थापन झालेल्या ‘मोर्फा’ने (महाऑरगॅनिक अॅन्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन) हा मुद्दा केंद्रीय कृषी मंत्रालयासमोर मांडला आहे.

‘मोर्फा’चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे म्हणाले, ‘‘आम्ही श्री. तोमर यांची भेट घेत जिवाणू स्लरी व दशपर्णी अर्क यांचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर या निविष्ठांबाबत संशोधन करण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.’’

देशभर सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. मात्र, या शेती पद्धतीत कीडरोगांशी सामना करताना शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. जिवाणू स्लरी यात मोलाची भूमिका बजावते. मात्र, प्रत्यक्ष पिकांसाठी कोणते जिवाणू उपयुक्त ठरतात, याची माहिती शेतकऱ्यांना नाही.

Organic Farming
Organic Farming : राज्यात २५ लाख हेक्टरमध्ये सेंद्रिय शेती अभियान राबविणार

त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर देशभर अनेक शेतकरी जिवाणू स्लरी तसेच दशपर्णी अर्क तयार करीत असले तरी त्यांना शास्त्रीय अंग अद्यापही समजावून सांगण्यात आलेले नाही, असे ‘मोर्फा’ने कृषिमंत्र्यांना सांगितले.

दरम्यान, देशभर ५० पेक्षा जास्त कृषी विद्यापीठे आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारित अनेक संशोधन केंद्रे असतानाही जिवाणू स्लरी व दशपर्णी अर्कावर संशोधन का झाले नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Organic Farming
Organic Farming : पर्यावरणाची हानी सेंद्रिय शेतीतून टाळावी

‘विद्यापीठांना पुरेसा निधी मिळावा’

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले, ‘‘द्रवरूप जिवाणूंबाबत विद्यापीठांनी संशोधन केलेले आहे.

जमिनीत पिकाच्या मुळाभोवती राहून असहजीव पद्धतीने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करणारे अॅझोटोबॅक्टर जिवाणूंबाबत विद्यापीठाच्या शिफारशी उपलब्ध आहेत.

शास्त्रज्ञांनी कष्टपूर्वक अॅसॅटोबॅक्टरवर देखील संशोधन केले आहे. हे जिवाणू आंतरप्रवाही असून पिकांच्या मुळांमध्ये घुसून नत्राचे स्थिरीकरण करतात. स्फुरद विरघळवणारे जिवाणूही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

त्यामुळे जिवाणू स्लरीमधील जिवाणू व दशपर्णी अर्कातील उपयुक्त घटक शोधणे सहज शक्य आहे. मात्र, त्यासाठी विद्यापीठांना पुरेसा निधी मिळायला हवा.”

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com