Turmeric Variety : हळदीच्या ३३ वाणांची संशोधन प्रात्यक्षिके

Turmeric Research : वसमत (कन्हेरगाव) येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर यंदा प्रथमच देशभरातील हळदीच्या ३३ वाणांची संशोधन प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत.
Turmeric Variety
Turmeric Variety Agrowon
Published on
Updated on

Hingoli News : जिल्ह्यातील वसमत (कन्हेरगाव) येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर यंदा प्रथमच देशभरातील हळदीच्या ३३ वाणांची संशोधन प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत.

रोहा (जि. रत्नागिरी) येथील काढणीपश्‍चात पदवीधर तंत्रज्ञान संस्था येथे कार्यरत हळद पिकाचे अभ्यासक डॉ. जितेंद्र कदम यांनी हळद पीक प्रात्यक्षिकांची पाहणी करून संशोधनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील, व्यवस्थापकीय संचालक दिलीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनात तंत्राधिकारी रमेश देशमुख आदिसह तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी यंदा हळद संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर भारतातील विविध राज्यांत पिकविणाऱ्या हळदीच्या तब्बल ३३ विविध वाणांची संशोधन प्रात्यक्षिकांसाठी लागवड करण्यात आली आहे.

Turmeric Variety
Turmeric Market : हळदीचे भाव काही दिवसांपासून का स्थिरावले?

या ठिकाणी हळदीच्या फुले स्वरूपा, प्रतिभा, प्रगती या वाणांचा बेणे उत्पादन कार्यक्रम घेण्यात आहे. लागवड केलेल्या हळदीच्या वाणांमध्ये सुदर्शना, सुवर्णा, पीतांबर, रोमा, उत्तर रागेणी, एनडीएच ८, काळी हळद, लॅकडाँग, बीएसआर १, बीएसआर २, अरुणाचल लोकल, सुरंजना, आंबेहळद, पंजाब १, पंजाब २, आरएच ५, शोभा, अलेप्पी सुप्रिम या वाणांची बारकाईने पाहणी केल्यानंतर डॉ. कदम यांनी या वाणांचे गुणधर्म वैशिष्ट्याबद्दल माहिती दिली.

Turmeric Variety
Turmeric Research : हळद संशोधन केंद्राद्वारे शेतकऱ्यांच्या प्रगतीला दिशा मिळेल

प्रक्षेत्रावरील या सर्व वाणांची पीक परिस्थिती समाधानकारक आहे. पहिल्याच वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हळदीच्या वाणांची लागवड केल्यामुळे या भागातून जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही प्रात्यक्षिके बघता येतील. त्याचा लागवडीसाठी फायदा होईल.

या प्रात्यक्षिकांमुळे या भागात लागवडीसाठी योग्य वाणांवर संशोधनाची दिशा ठरविता येईल असे नमूद केले. प्रक्षेत्रावरील या वाणांची संशोधनाच्या दृष्टीने शास्त्रीय पद्धतीने निरीक्षणे व नोंदी तसेच पिकावरील किडी, रोग व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनबद्दल आवश्यक शिफारशी डॉ. कदम यांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com