Seed Production : ‘महाबीज’च्या खरीप बीजोत्पादन कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू

ज्यूट या पिकांच्या बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. शेतकऱ्यांनी महाबीजच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात योग्य नियोजन केल्यास या पिकाचे एकरी ७ क्विंटल उत्पादन मिळू शकते.
Rabi Seed
Rabi SeedAgrowon
Published on
Updated on

Parbhani News परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात (Kharif Season) ‘महाबीज’च्या बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत (Seed Production Program) सोयाबीन ७ हजार ७२५ हेक्टर, तूर २५ हेक्टर, मूग १२ हेक्टर, उडीद ५० हेक्टर, ज्यूट २०५ हेक्टर असे एकूण ८ हजार १३३ हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे.

यंदा ज्यूट बीजोत्पादनावर भर दिला जाणार आहे. बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना आगाऊ आरक्षण नोंदणी (ता. १०) मेपर्यंत करता येईल, अशी महाबीजचे माहिती जिल्हा व्यवस्थापक अरुण चव्हाण यांनी दिली.

ज्यूट या पिकांच्या बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. शेतकऱ्यांनी महाबीजच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात योग्य नियोजन केल्यास या पिकाचे एकरी ७ क्विंटल उत्पादन मिळू शकते.

Rabi Seed
Mahabeej Seed Production : ‘महाबीज’कडून सोयाबीन, उडीद बीजोत्पादन

या पिकाला वन्य प्राण्याचा धोका नाही. बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत उत्पादित ज्यूट बियाण्याची खरेदी प्रतिक्विंटल ४ हजार रुपये या हमीभावानुसार करणार असून, त्यानंतर ४ हजार रुपये बोनस शेतकऱ्यांना दिला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विटंल ८ हजार रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकेल.

बीजोत्पादन कार्यक्रमा करीता आवश्यक असलेली पायाभूत बियाणे बीजोत्पादकांना महाबीज मार्फत योग्य किमतीत देण्यात येते. पिकांचे सपूर्ण उत्पन्न महाबीज परत घेते. बीजोत्पादन कार्यक्रमाकरिता पायाभूत उच्च दर्जाचे बियाणे वापरल्यामुळे उत्पादनात वाढ होते.

Rabi Seed
Onion Seed Production : कसे आहे डाळे कुटुंबाचे कांदा बीजोत्पादन तंत्र?

बाजार भावांपेक्षा २० ते २५ टक्के जास्त दर मिळत असल्याने आर्थिक फायदा होतो. बियाणे उगवण क्षमता तसेच चांगल्या बियाण्याचे प्रमाण या गुणवत्ता निकषावर प्रतिक्विंटल ७५ ते १२५ रुपये वाढीव भाव दिला जातो.

एका गावात सर्व पिकांचे मिळून ५० एकर एवढे बीजोत्पादन क्षेत्र असणे आवश्यक आहे. आगाऊ आरक्षण नोंदणीसाठी अंतिम ता. १० मे २०२३ पर्यंत आहे.

त्याकरिता स्वसाक्षांकित सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक सत्यप्रत प्रति सोबत आणाव्यात. बीजोत्पादन कार्यक्रमाच्या अगाऊ आरक्षण करण्याकरिता संबंधित कृषी क्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

महाबीज कृषी क्षेत्र अधिकारी तालुकानिहाय संपर्क

परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पालम सचिन काळे (मो. ९४०५११८८११), जिंतूर, सेलू, सचिन सोनवणे (मो. ९४२१३६४९९१), पाथरी, परभणी मोहन धांडे (मो. ८७६६७४०२३४), परभणी धनंजय गायकवाड (मो. ९७६५११७७०३), मानवत, पूर्णा जमीर समदाणी (मो. ९०२८०६६१०५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com