Orange GI : भौगोलिक मानांकनासाठी राज्यात २५० संत्रा उत्पादकांची नोंदणी

चव, रंग आणि इतर गुणवैशिष्ट्ये जपणाऱ्या नागपुरी संत्र्याचे भौगोलिक मानांकन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मिळाले आहे.
Nagpur Orange
Nagpur OrangeAgrowon
Published on
Updated on

नागपूर ः चव, रंग आणि इतर गुणवैशिष्ट्ये जपणाऱ्या नागपुरी संत्र्याचे (Nagpur Orange) भौगोलिक मानांकन (Geographicak Index) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मिळाले आहे. मात्र त्यानंतर वैयक्‍तिक प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता; विद्यापीठही याबाबत उदासीन होते.

अखेरीस कृषी तसेच पणन विभागाने या संदर्भात मोहीम उघडत केलेल्या प्रयत्नांती नागपुरी संत्रा उत्पादक २५० शेतकऱ्यांनी वैयक्‍तिक प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना या पीकवाणांची लागवड, विक्री करणे सुलभ होणार आहे.

Nagpur Orange
Orange MSP : ‘संत्र्याला हमीभावाचे संरक्षण द्या’

राजे रघुजी भोसले हे दक्षिणेतील स्वारीवर असताना त्यांना याकाळात त्या भागातील राज्यांनी संत्रा रोपे भेट दिली होती. या रोपांची लागवड राजे रघुजी भोसले यांनी नागपूरला परतल्यावर केली असता या भागातील वातावरण आणि मातीत ती चांगल्या प्रकारे रुजली. त्याला आंबट-गोड चवीची फळेही लागली.

हाच संत्रा पुढे नागपूरी संत्रा म्हणून नावारुपास आला. नागपूरी संत्र्याची लागवड महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांसोबतच लगतच्या मध्यप्रदेश व राजस्थानमध्येही मोठ्या प्रमाणावर होते. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या वाणाच्या भौगोलिक मानांकनाचा प्रस्ताव सादर केला होता. उद्यानविद्या विभागाचे डॉ. प्रकाश नागरे, शशांक भराड यांच्या नेतृत्वात हे काम तडीस गेले.

Nagpur Orange
Nagpur Orange : अडीचशे नागपुरी संत्रा उत्पादकांनी केली वैयक्‍तिक ‘जीआय’ नोंदणी

दरम्यान, भौगोलिक निर्देशांक (जीआय) वापरासाठी शेतकऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र आवश्‍यक राहते. मात्र याविषयी जागृती आणि माहितीचा अभाव असल्याने शेतकरी वैयक्‍तिकस्तरावर नोंदणीकरिता पुढे येत नव्हते.

भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतरही वैयक्‍तिक नोंदणीची प्रक्रिया रखडल्याने त्याचा काही एक उपयोग होणार नव्हता. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून नागपूर येथे कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्याच परिणामी आधी शुन्यावर असलेली ही नोंदणी आता २५० च्या घरात पोहचली आहे. याचा उत्पादन, विक्रीसाठी लाभ घेता येतो व दहा वर्षांकरिता हे ग्राह्य ठरते.

भौगोलिक निर्देशांक असलेल्या शेतीमालाचे उत्पादन घेण्यासाठी त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना वैयक्‍तिक नोंदणीची गरज राहते. त्यासाठी नाममात्र दहा रुपये शुल्क आकारले जाते. नागपूरी संत्रा उत्पादकांनी सुरुवातीला याला प्रतिसाद दिला नाही. जागृतीनंतर २५० शेतकऱ्यांनी वैयक्‍तिक नोंदणी केली आहे. त्यांना नागपूरी संत्रा लोगो मार्केटिंगच्यावेळी वापरता येईल.

- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com