Labor Shortage : उन्हाळी शेतीकामाला वेग, कामासाठी मजुरांची टाळाटाळ

तापमानाचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला आहे. अशावेळी उन्हाळी शेतीकामांनाही वेग आला आहे.
Labor Shortage
Labor ShortageAgrowon

Agriculture News केत्तूर ः करमाळा शहरासह ग्रामीण भागातही (rural Weather) सूर्य आग ओकू लागल्याने तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. उजनी लाभक्षेत्रात उजनीच्या पाण्याची (Ujani Dam) मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने उष्णतेचा पारा जास्त जाणवत आहे.

तापमानाचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला आहे. अशावेळी उन्हाळी शेतीकामांनाही वेग आला आहे. मात्र वाढत्या तापमानात कामासाठी मजूर येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Labor Shortage
Labor Shortage : श्रमिक कमतरतेचे वास्तव

सध्या उसाची तसेच भाजीपाला पिके व इतर पिकांची खुरपणी करणे आवश्यक असताना उन्हामुळे महिला मजूर कामाला येत नाहीत. मजुरीचे दरही २५० ते ३०० रुपये एवढे आहेत. एकीकडे उन्हाळ्यामुळे पिके पाण्याला लवकर येत आहेत.

Labor Shortage
Sugarcane Labor : ऊसतोड कामगार पुरविण्याच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक

उन्हात पिके पिकवायला उन्हात कष्ट घ्यावे लागतात. परंतु बाजारभावाने ऐनवेळी दगा दिल्यास आर्थिक नुकसानीलाही तोंड द्यावी लागते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो, असे पोमलवाडी येथील भाजीपाला उत्पादक शिवाजी लोखंडे यांनी सांगितले.

त्यातच अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे व उत्पन्नात घट येत आहे. वाढणाऱ्या उन्हामुळे महिला मजूर डोक्यावर स्कार्फ घालून खुरपणी करीत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com