Animal Husbandry Department Recruitment : पशुसंवर्धन विभागाच्या ८६७ पदांची भरती रद्द

नव्या आकृतिबंधानुसार परिचर पदेही रद्द; ऑगस्टपर्यंत नवी भरतीप्रक्रिया
Animal Husbandry Department
Animal Husbandry DepartmentAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई/पुणे : राज्यात सरकारी नोकरीसाठी महाभरती (Mahabharti) मेळाव्यांचे आयोजन करण्याचा डंका वाजविणाऱ्या राज्य सरकारने (State Government) जिल्हा परिषद पाठोपाठ पशुसंवर्धन विभागातील (Animal Husbandry Department ) ८६७ पदांची भरती रद्द केली आहे.

नव्या आकृतिबंधानुसार पशुसंवर्धन विभागातील परिचर पदे रद्द करण्यात आली आहेत.

Animal Husbandry Department
Animal Husbandry Department : पशुसंवर्धन विभागाला पदोन्नतीचे वावडे

२०१७ आणि २०१९ मध्ये जाहीर केलेली पदभरती रद्द करून नव्या आकृतिबंधानुसार ऑगस्ट २०२३ पर्यंत ही भरती प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. तसेच भरती रद्द झाल्याने उमेदवारांनी भरलेले पैसे परत केले जाणार आहेत.

२०१७ मध्ये १३८ पदाची सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली. यामध्ये ११४ पशुसंवर्धन पर्यवेक्षक, १० वरिष्ठ लिपिक, ७ लिपिक टंकलेखक, २ स्टेनो, ५ चालक अशी पदे होती. तर २०१९ मध्ये सरळसेवा कोट्यातील क आणि ड वर्ग संवर्गातील ७२९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली.

यामध्ये १४९ पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि ५८० पदे परिचर पदाची होती. या सर्व पदांसाठी राज्यातून दोन लाख अर्ज प्राप्त झाले होते.

Animal Husbandry Department
Animal Husbandry Department : पशुसंवर्धन विभागाचे सहा अधिकारी अखेर परतले

२०१७ मध्ये क वर्गातील पशुधन पर्यवेक्षक आणि ड गटातील परिचर अशी १३८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कुणाल आयटी सर्व्हिसेस या खासगी संस्थेद्वारे भरती प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार होती.

या संस्थेने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामही सुरू केले होते. मात्र, यामध्ये घोटाळा होण्याचा संशय आल्याने या संस्थेऐवजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, बालभारती, महापरीक्षा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला प्रश्नपत्रिका तयार करण्याची विनंती केली होती.

मात्र, या संस्थांनी प्रश्नपत्रिका तयार करण्यास असमर्थ असल्याचे आयुक्त कार्यालयाला कळविले होते. दरम्यान २०१९ मध्ये ७२९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली. या पदांसाठी १० ते २९ ऑगस्ट, २०१९ दरम्यान परीक्षा होणार होती.

मात्र, ही परीक्षाही पूरपरिस्थितीमुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात येणार होती. मात्र, प्रश्नपत्रिकाच तयार नसल्याने ही परीक्षा झाली नाही.


या दोन्ही परीक्षा रद्द झाल्यानंतर वित्त विभागाने नव्याने आकृतिबंध तयार करण्याची सूचना पशुसंवर्धन विभागाला केली होती. त्यानुसार नव्याने आकृतिबंध तयार करून परिचर पदे रद्द करण्यात आली आहेत.

उमेदवारांच्या भावनेशी खेळ
२०१७ आणि २०१९ च्या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरून पैसेही भरून घेण्यात आले. राज्यभरातून या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल २ लाख अर्ज महापोर्टलद्वारे आले होते.

मात्र, २०१७ पासून भरती प्रक्रियेचा सरकारने खेळखंडोबा करत उमेदवारांच्या भावनेशी खेळ खेळला. आता टीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्थांमार्फत ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

४०० पदांची जाहिरात लवकर निघेल असेही पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या विभागात २००४ पासून ५८० पदे रिक्त आहेत.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून नोकर भरतीच्या घोषणाबाजींचा पाऊस पडतोय. हे सरकार तर नोकर भरती काढतच नाही.

परंतु या आधीचे अर्ज भरलेले आहेत त्या परीक्षा ही रद्द करत आहेत. आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो. लवकर पशुसंवर्धन विभागाची परीक्षा जर नाही घेतली तर आम्हाला आंदोलन करावे लागेल.
- महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com