PM Kisan : ‘पीएम किसान’ लाभधारकाच्या नावापुढे जमीन नसल्याची नोंद

महसूल विभागाचा सावळा गोंधळ; अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे
PM Kisan
PM KisanAgrowon

सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे शेती आहे, की नाही याची पडताळणी करण्यासाठी शासनाने गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी महसूल विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार गाव कामगार तलाठी यांनी त्याची पडताळणी केली.

परंतु पीएम किसानच्या पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे, त्या शेतकऱ्यांच्या प्रोफाइलवर (Land Seeding) या रकान्यासमोर नो असा उल्लेख केला आहे. अर्थात, त्या शेतकऱ्याची शेती असूनही नसल्याची नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गाव कामगार तलाठ्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून शेतीची पडताळणी केली असल्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्याने पुन्हा एकदा महसूल विभागाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. वारंवार सर्व्हर डाउन होतोय, खात्यावर वेळेत हप्ता जमा होत नाही.

दररोज नव्या त्रुटींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी महा-ई सेवा केंद्र, आपले सरकारमध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण केली. त्यामुळे दिवाळीच्या अगोदर दोन हजार रुपयांचा हप्ता खात्यावर वर्ग झाला. मात्र अनेक शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकरी संतप्त झाले.

PM Kisan
Crop Management : पाणी साठून राहिलेल्या बागेत करावयाच्या उपाययोजना

मुळात ई-केवायसी करण्यापूर्वी अर्थात दीड ते दोन महिन्यांपूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या नावे किती शेतजमिनीची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांची असणारी शेतजमिनीची पडताळणी गाव कामगार तलाठी यांनी केली. शेतकऱ्यांचे शासनाने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे त्यात बदल करण्यात आला.

परंतु शेतजमीन पडताळणी करताना तलाठ्यांनी कोणत्या आधारावर केली आहे. या बाबत कोणताही अधिकारी काहीही सांगण्यास तयार नाहीत. गावातील तलाठी यांना संबंधित शेतकरी भेटण्यास गेले, परंतु भेट झाली नाही. त्यांनी फोनवरून सर्व माहिती सांगितली.

तलाठ्याने केवल ऐकून घेतले. गेल्या तीन दिवसांपासून तलाठी, तहसील कार्यालय असे हेलपाटे सुरू आहेत. मात्र त्याचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही. महसूल विभाग थेट कृषी विभागाशी संपर्क साधा. त्यांनाच याबाबत माहिती विचारावी, असे वारंवार सांगण्यात येत आहे.

माझ्या सातबारावर चार एकर शेती आहे. यापूर्वी मला पीएम किसानचे हप्ते मिळाले आहेत. परंतु सध्या पीएम किसानच्या पोर्टलवरील माझ्या प्रोफाईलवर शेतीच नाही, असा शेरा आहे. याबाबत संबंधित विभागाकडे गेलो असता, कोणीही दाद घेण्यास तयार नाही. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

- तात्यासो नागावे, खटाव, जि. सांगली, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com