Rahul Kul : राऊतांचे आरोप अपुऱ्या माहितीच्या आधारे ; कथित ५०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी राहुल कुल यांचे स्पष्टीकरण

भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या राहुल कुल यांच्यावर राऊत यांनी ५०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रींग व्यवहाराचे आरोप केले आहेत.
Rahul Kul
Rahul KulAgrowon

Bhima Patas Sugar Mill Scam शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.

यासंदर्भात राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांना पत्र लिहिले आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. याबाबत आता कुल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या राहुल कुल यांच्यावर राऊत यांनी ५०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रींग व्यवहाराचे आरोप केले आहेत. राऊत यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप केल्याचे म्हटले आहे.

गेल्या २२ वर्षांपासून कारखान्याचा अध्यक्ष आहे. सातत्याने कारखाना सुरक्षित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. सहकारी साखर कारखान्याचे खासगिकरण होवू नये, यासाठी प्रयत्न केल्याचे कुल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Rahul Kul
Sanjay Raut : भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार? ; संजय राऊतांचा राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप

कुल म्हणाले की, राजकारणात असताना अशा प्रकारचे आरोप होणे अपेक्षित असून यामागे राजकारणाव्यतिरिक्त काही दिसत नाही. संजय राऊत म्हणाले म्हणजे घोटाळा होतो असं नाही. या संदर्भात तक्रार करण्यासाठी विविध व्यवस्था आहेत. त्याठिकाणी तक्रार केल्यास त्याला आम्ही उत्तर देवू, असेही त्यांनी म्हटले.

Rahul Kul
Ajit Pawar : विधीमंडळ कामकाजाची माहिती मिळत नाही

काय आहेत राहुल कुल यांच्यावरील आरोप

१) राहुल कुल यांनी ५०० कोटी रुपयांचे मनी लाँड्रींग केले

२) दौंडमधील भीमा-पाटस साखर कारखान्याच्या माध्यमातून गैरव्यवहार

३) २०१६ ते २०२२ या कालावधित खुल्या साखर साठ्याच्या विक्रीतून १६० कोटी २५ लाखांचा घोटाळा

४) गळीत हंगाम बंद असताना परस्पर खुल्या साखर साठ्याची विक्री करून घोटाळा केला.

या आरोपांनंतर दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना आपण किरीट सोमय्या यांना या घोटाळ्याची कागदपत्रे चार वेळा पाठविल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी या घोटाळ्याची तक्रार करण्यास नकार दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केलेल्या एका आक्षेपार्ह विधानासंदर्भात राऊत यांना हक्कभंगाची नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी गठीत करण्यात आलेल्या हक्कभंग समितीचे राहुल कुल हे अध्यक्ष आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com