

Eknath Shinde's Call To Raju Shetti : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. १३) कोल्हापूर दौऱ्यावर असून ते शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
शेट्टी हे राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जाब विचारण्यासाठी येणार होते. दरम्यान या इशाऱ्याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी खासदार शेट्टींना बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
यासंदर्भात शेट्टी यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, आज कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात माझ्यासह अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते आंदोलन करणार होतो. काल (ता.१२) रात्री साडे अकरा वाजता मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. १५ जून रोजी दुपारी ३.०० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.
या मुद्यांवर स्वाभिमानी आक्रमक
१) ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करणे.
२) महाविकास आघाडी सरकारने केलेला दोन टप्प्यातील एफ. आर. पी चा कायदा रद्द करणे.
३) महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतील प्रलंबित प्रोत्साहनपर अनुदान तातडीने खात्यावर जमा करणे.
४) ऊस वाहतुकदारांची फसवणूक केलेल्या मुकादमांवर गुन्हे दाखल करणे.
५) गारपीट, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पिक विम्याची रक्कम तातडीने जमा होणे.\
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे आजचे आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करत असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. तसेच या मुद्याबाबत जर १५ जूनच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही तर येथून पुढे राज्यातील होणारे शासन आपल्या दारी या उपक्रमात स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित राहून सरकारला याचा जाब विचारतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.