Rain Gauge : पाऊस मोजण्याची यंत्रे वाढविणार ः मंत्री पाटील

पावसाचे मोजमाप योग्य होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येतात.
Rain Gauge
Rain GaugeAgrowon

बुलडाणा : ‘‘पावसाचे मोजमाप योग्य होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) मिळण्यास अडचणी येतात. ही बाब लक्षात घेता पावसाचे मोजमाप (Rain Gauge System) करणारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी अतिरिक्त निधी देऊन यातून पाऊस मोजमाप करणारी यंत्रे उभारण्यात येतील. त्यांची देखभाल आणि दुरूस्तीही योग्यप्रकारे करण्यात येईल,’’ अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Rain Gauge
Onion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर

येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा नियोजनच्या सर्वसाधारणमधून ३२६ कोटी, विशेष घटक योजनेतून १४ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेतून १०० कोटी असा एकूण ४४० कोटी रूपयांचा निधी यावर्षी उपलब्ध होणार आहे. विकासकामे पूर्ण करण्यासाठी पाच महिन्यांचाच कालावधी राहिला आहे. त्यामुळे कामे होण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी.’’

‘‘जिल्ह्याचा विकास करण्यासाठी यावर्षीच्या कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. विभागांना दिलेला संपूर्ण निधी खर्च व्हावा, यासाठी परिपूर्ण नियोजन करावे. कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी असला तरी ही कामे गुणवत्तापूर्ण होण्यावर भर द्यावा. जळगाव जिल्ह्यात शाळांना संरक्षण भिंती बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातही अशाच प्रकारे नाविण्यपूर्ण कामे हाती घ्यावीत. जिल्ह्यात शाळा आणि स्मशानभूमीची कामे हाती घ्यावीत. केवळ एकाच बाबीवर लक्ष केंद्रीत करून खर्च केल्यास त्याचा परिणाम होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील गावे ‘जलजीवन मिशन’मध्ये घ्यावीत,’’ अशी सूचनाही त्यांनी केली.

Rain Gauge
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

‘‘‘लम्पी स्कीन’मुळे जनावरे दगावली असल्यास शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत व्हावी, यासाठी पंचनाम्याची गती वाढवावीवी. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत आणि शेतीचे नुकसान झाल्यास पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी गतीने कार्यवाही करावी,’’ अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

शहिदाच्या कुटुंबियांना धनादेश

बैठकीच्या सुरुवातीला द्रास सेक्टरमध्ये शहिद झालेले चिखली येथील कैलास पवार यांच्या विरमाता उज्जला पवार आणि विरपिता भारत पवार यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com